मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून नागरिकांना काही प्रमाणात त्रासाचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने जुलैच्या पहिल्या आठवड्यात कोकण, मध्य महाराष्ट्रासह राज्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे, ज्यामुळे जूनमधील पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता आहे.

मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. आज सकाळपासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत असल्याचं दिसून आलं आहे. जोरदार पावसाच्या सरी कोसळलायला सुरुवात झाली असून त्यामुळं नागरिकांनी खबरदारी घेण्याचं अवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात होणार 

चांगला पाऊस जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात चांगला पाऊस होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. जून महिन्यामध्ये जवळपास ४७ टक्के पावसाची तूट निर्माण झाली होती. हवामान विभागानं जुलै महिन्यात चांगला पाऊस पडेल असं सांगितलं आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसोबत नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झालं आहे.

महाराष्ट्रात कुठं होणार पाऊस? 

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आठवडाभर कोकण आणि गोवा येथील भागांमध्ये मजबूत पाऊस पडणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहणार आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे.