मुंबईतील चेंबूर येथे बसवर झाड पडून एका मुलाचा मृत्यू झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सत्ताधारी शिंदे गटावर टीका केली आहे. त्यांनी या दुर्घटनेला काँक्रिटीकरण जबाबदार असल्याचे म्हटले असून, मुंबईच्या महापौरांना मुंबईपेक्षा ढाक्याची जास्त काळजी वाटते, असा टोला लगावला.

आदित्य ठाकरे हे आता सत्ताधारी आणि शिंदे गटावर टीका करताना दिसून येत आहेत. मुंबईतील चेंबूरमध्ये बस गाडीवर झाड पडल्यामुळं एका मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळं आदित्य ठाकरे यांनी महापौरांवर टीका केली. त्यांनी यावेळी कॉन्ट्रॅक्टर, शिंदे सेना आणि ऑपरेशन देवेंद्र यावर भाष्य केलं. त्यांचे जुने सहकारी सचिन आहिर हे त्यांना सोडून शिंदे सेनेत दाखल झाले.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

काय म्हणाले आदित्य ठाकरे? 

पावसाळ्यात दुर्घटना घडण्याच प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. झाडांच्या मुळांजवळ आपण जर काँक्रिटीकरण करणार असू तर चेंबूरला झालेली दुर्घटना परत होऊ शकते. त्यामुळं आम्ही पहिल्यापासून अशा घटना कशा टाळता येतील याकडं लक्ष देत आलो आहोत. मुंबईच्या महापौरांना मुंबईपेक्षा बांग्लादेशमध्ये काय चाललंय यामध्ये जास्त रस असल्याचं यावेळी ठाकरेंनी म्हटलंय.

महापौरांवर केली टीका 

मुंबईच्या महापौरांवर यावेळी टीका केली आहे. त्यांनी म्हटलंय की, मुंबईच्या महापौरांना मुंबईपेक्षा जास्त ढाक्याची काळजी वाटते. भाजपचे अनेक कार्यकर्ते असे आहेत ज्यांनी पक्षाला सत्ता नसताना काम केलंय. दुसऱ्या पक्षातून आलेल्या नेत्यांना जर आपण पद देणार असू तर या निष्ठावंतांना कधी न्याय मिळणार? आम्हाला जर आधीच न्याय मिळाला असता तर आज जी परिस्थिती आहे ती झाली नसती.