MLC Election Update : विधान परिषदेच्या निवडणुकीत अनिल परब यांना परत संधी, उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले 2 उमेदवार

| Published : May 25 2024, 09:39 AM IST / Updated: May 25 2024, 09:40 AM IST

Uddhav Thackeray

सार

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दोन उमेदवार जाहीर केले आहेत. माजी मंत्री अनिल परब यांना परत संधी देण्यात आली आहे. 

शिक्षण आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुका लवकरच होणार आहेत. त्या निवडणुकांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या पक्षाचे उमेदवार जाहीर केले आहेत. त्यांच्या पक्षाने आघाडी केली असून त्यांनी माजी मंत्री अनिल परब आणि आणि ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी येत्या 26 जून रोजी मतदान केले जाणार आहे. 

अनिल परब यांना देण्यात आली परत संधी - 
अनिल परब यांना शिवसेना पक्षाकडून परत संधी देण्यात आली आहे. गेल्या 12 वर्षांपासून त्यांना पक्षाने लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी दिली होती. त्यांना पक्षाने सर्वात आधी 2012 आणि नंतर 2018 मध्ये परत संधी देण्यात आली होती. अत्यंत विश्वासू असणारे परब हे उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये परिवहन मंत्री होते. शिवसेना सुटल्यानंतर अनिल परब हे उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहिले होते. 

वकील असणाऱ्या अनिल परब यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. अनिल परब हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहिले होते आणि त्यांनी पक्षाची भूमिका बजावली होती. शिक्षक मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने ज. मो. अभ्यंकर यांना तिकीट दिले आहे. अभ्यंकर हे शिवसेनेच्या शिक्षक प्रदेशाध्यक्ष आहेत. ते शिक्षकांच्या आणि पदवीधरांची हक्कांसाठी लढत आहेत. येत्या 26 जूनला दोन शिक्षक आणि दोन पदवीधर मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघात ही निवडणूक होत आहे. 
आणखी वाचा - 
Pune Porsche Accident : कर्तव्यात दुर्लक्ष केल्याबद्दल दोन पोलिसांचे निलंबन, आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पाठपुराव्याला यश
Pune Porsche Accident : हिट अँड रन केसमधील त्या अल्पवयीन मुलाच्या पित्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी