Pune Porsche Accident : हिट अँड रन केसमधील त्या अल्पवयीन मुलाच्या पित्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

| Published : May 24 2024, 07:05 PM IST / Updated: May 24 2024, 07:06 PM IST

Pune Porsche Taycan car

सार

पुण्यातील कल्याणी नगर येथे झालेल्या अपघातातील त्या अल्पवयीन मुलाच्या पित्याला पुणे सत्र न्यायालयाने 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याची आज कोठडी संपणार असल्याने त्याला आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं.

पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या कार अपघातामुळे राज्यासह देशभरात संताप व्यक्त केल्या जात आहे. विशाल अग्रवालच्या मुलाने पोर्शे कार चालवत दुचाकीला धडक दिल्याने दोघाना जीव गमवावा लागला. याप्रकरणी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला ४ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्यात आले आहे.त्याचबरोबर विशालला सत्र न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. आज ती संपल्याने पुन्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्याला पोलीस कोठडीची आवशक्यता नसल्याचे देखील न्यायालयाने स्पष्ट केले.

दोन्ही वकिलांकडून जोरदार युक्तिवाद :

न्यायालयात दोन्ही बाजूंच्या वकीलांकडून युक्तिवाद करण्यात आला. आरोपीच्या वकिलांकडून प्रशांत पाटील यांनी युक्तिवाद केला. घटनेच्या दिवशी गंगाराम नावाचा ड्रायव्हर होता. ड्रायव्हर पहील्या दिवसापासुन तपासासाठी उपलब्ध आहे. १७५८ रुपये आरटीओची फी भरली नाही. म्हणून आयपीसीचा ४२० लावला आहे. अशा प्रकारे कलम लावणे ते योग्य आहे का?पाटील पुढे म्हणाले की, सुप्रिम व हाय कोर्टाचे निर्णय आहे कोणत्याही व्यक्तीला त्याच्यावरील गुन्हा चुकीचा वाटत असेल तर तो कोठे ही राहुन अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करू शकतो. अशी तरतुद असताना देखील छत्रपती संभाजीनगरला पोलिसांना आणखी तपास करायचा आहे.हे पोलीस का म्हणत आहेत? तसेच पोलीस कोठडी मागताना हे चुकीचे असल्याचे पाटील यांनी नमूद करत आता आरोपीला न्यायालयाने या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

प्रकरणात आला नवीन ट्विस्ट :

या अपघाताच्या प्रकरणात आता नवीन ट्विट आला असून याबाबतची अपडेट समोर आली आहे. अपघात झाला त्यावेळी ड्रायव्हर गाडी चालवत होता असे कुटुंबाच्या आणि मित्रांच्या वतीने सांगण्यात आले आहे. चालकाची गुरुवारी परत चौकशी करण्यात आली आहे. विशाल अग्रवाल यांनी नियुक्त केलेला ड्रायव्हर पोर्शे गाडी चालवत होता असा दावा करण्यात येत आहे.

पुणे हिट अँड रन प्रकरणात किती जणांना अटक ?

पोलिसांनी आत्तापर्यंत आरोपीचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासह ५ जणांना अटक केली आहे. एफआयआरनुसार, अल्पवयीन मुलाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हते. हे माहीत असूनही त्याच्या वडिलांनी त्याला गाडी चालवायला दिली. गाडीची नोंदणीही झाली नव्हती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बिल्डरला देखील माहित होते की त्याचा मुलगा दारू पितो, तरीही त्याने त्याला पार्टीला जाऊ दिले.याशिवाय पोलिसांनी अटक केलेल्या अन्य चार जणांमध्ये पुण्यातील कोजी रेस्टॉरंटच्या मालकाचा मुलगा नमन प्रल्हाद भुतडा, व्यवस्थापक सचिन काटकर, ब्लॅक क्लब हॉटेलचे व्यवस्थापक संदीप सांगळे आणि त्यांचा कर्मचारी जयेश बोनकर यांचा समावेश आहे.

आणखी वाचा :

Pune Porsche Accident : पोर्शे असलेला श्रीमंत माणूस रिमांड होममध्ये कसा घालवणार दिवस? जाणून घ्या वेदांतचा दिनक्रम

अल्पवयीन मुलगा नाहीतर ड्रायव्हर चालवत होता गाडी, पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या मित्रांनी केला दावा

..."पुन्हा भेटुयात नव्या पोलीस स्टेशनचा ग्राउंड रिपोर्ट घेऊन" म्हणत धंगेकरांचा पुणे पोलिसांवर घणाघात