सार

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व गुन्हे आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आले आहेत. चार गुन्ह्यांत नऊ आरोपी असून त्यातील पाच जण अद्याप फरार आहेत. या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी बीडमध्ये मोर्चा निघणार आहे.

बीड: केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभरात गाजत आहे. या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर येत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण हे तीनही गुन्हे आता सीआयडीकडे (गुन्हे अन्वेषण विभाग) वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील बीड पोलिसांची भूमिका संपली आहे.

यापूर्वीच अपहण, खुन आणि अट्रॉसिटी हे गुन्हे सीआयडीकडे सोपविले होते. उर्वरित दोन गुन्हे पोलिस महासंचालकांच्या निर्देशाने वर्ग करण्यात आले. दरम्यान, चार गुन्ह्यांत एकूण नऊ आरोपी आहेत. यातील चौघे कोठडीत असून पाच जण फरार आहेत. 

तपास विशेष यंत्रणेकडे देण्याबाबत आधीपासून मागणी

बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हा मुद्दा देशाच्या संसदेत मांडला. संसदेबाहेर आघाडीच्या खासदारांनी आंदोलन केले. केंद्रीय गृहमंत्री अमीत शहांकडे याबाबत तक्रार देण्यात आली. सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्तेचा मुद्दा हिवाळी अधिवेशनातही गाजला. सत्तापक्षाच्या आमदारांसह विरोधी पक्षाच्या आमदारांनी अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरला. या प्रकरणाचा तपास विशेष यंत्रणेकडे देण्याबाबत आधीपासून मागणी होती. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येची घटना ९ डिसेंबर रोजी घडली होती. पण आजही मुख्य आरोपी फरार आहेत.

बीड मध्ये शनिवारी मोर्चा

फरार आरोपींच्या अटकेसह या गुन्ह्यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी शनिवारी २८ डिसेंबर रोजी सकाळी बीडमध्ये सर्वपक्षीय, सर्वधर्मीय मोर्चा निघणार आहे.

आणखी वाचा-

संतोष देशमुख हत्येचा धक्कादायक पोस्टमार्टम अहवाल, क्रूर मारहाणीमुळे झाला मृत्यू

16 दिवसांनंतरही मुख्य आरोपी फरार, खासदार सोनवणेंचा पोलिसांवर हल्लाबोल