तो येवल्यावाला म्हणतो की आम्ही एकत्र 60 टक्के आहोत, मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांच्यावर केली टीका

| Published : May 24 2024, 11:42 AM IST

manoj jarange patil

सार

मराठा क्रांती मोर्चापासून मनोज जरांगे हे महाराष्ट्रात चर्चेत आले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणावरून मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. मराठा आरक्षणावरून दोघांमध्ये कायमच टीका होत असते. 

मराठा क्रांती मोर्चापासून मनोज जरंगे हे नाव संपूर्ण महाराष्ट्राला माहित झाले. त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठो आंदोलन केली पण त्याला यश आले नाही. आता त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी परत एकदा आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. त्यांनी मराठ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. 

काय म्हणाले मनोज जरांगे - 
4 जूनला सगळ्यांनी अंतरवली सराटीकडे या. आरक्षण घेतल्याशिवाय सुट्टी द्यायची नाही. उपोषण मागे घेण्याचा आग्रह कोणीही करू नका. कोट्यवधींच्या संख्येने मराठ्यांनी एकत्र यावे. मॅनेज होत नाही हे समजल्यानंतर सरकारने डाव रचला. कोणत्या जातीचे लोक मराठा लोकांना त्रास करायचंय ते बघू, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीचे महाराष्ट्रातील सर्व टप्पे झाल्यानंतर मनोज जारांगे यांनी आंदोलनाचे बिगुल उपसले आहे. 

छगन भुजबळ यांच्यावर केली टीका - 
छगन भुजबळ यांच्यावर मनोज जरंगे यांनी टीका केली आहे. त्यांनी भुजबळ यांच्यावर टीका करताना म्हटले आहे की, तो येवल्यावाला म्हणतो की आम्ही एकत्र 60 टक्के आहोत. तू काय आम्हाला बधिर समजतो की काय? त्यानंतर म्हणे एसटी फुल भरलेली आहे. तझी नियत चांगली नसून तुला फक्त खायची सवय लागली आहे. तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. 

त्याचा सगळ्यात जास्त मराठा आरक्षणाला विरोध आहे. वंजारी आणि धनगर बांधवाच्या आरक्षणाचा धक्का लागत नाही. तरीही त्यांना तुमच्या सभेला बोलावता. धनगर आणि मुस्लिम बांधवाना ही आरक्षण कसे मिळत नाही हे बघतो, असे म्हणून त्यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली आहे.
आणखी वाचा - 
अल्पवयीन मुलगा नाहीतर ड्रायव्हर चालवत होता गाडी, पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील आरोपीच्या मित्रांनी केला दावा
Pune Porsche Accident : पोर्शे असलेला श्रीमंत माणूस रिमांड होममध्ये कसा घालवणार दिवस? जाणून घ्या वेदांतचा दिनक्रम