- Home
- Maharashtra
- Maharashtra Weather Alert: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाची शक्यता, राज्यातील 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट!
Maharashtra Weather Alert: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाची शक्यता, राज्यातील 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट!
Maharashtra Weather Alert: हवामान विभागाने नवरात्रीच्या सुरुवातीलाच राज्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला. राज्यातील ३० जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट!
मुंबई: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने राज्यातील 30 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला असून, विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया.https://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/IXkHG1yLUZ
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) September 21, 2025
नवरात्रीतील गरब्यावर पावसाचं सावट
नवरात्रीचा उत्सव जोरात सुरू होण्याआधीच पावसाचं सावट दिसत आहे. राज्यभरात विविध ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे आधीच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आता 22 सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
कोणकोणते जिल्हे अलर्टमध्ये?
कोकण व मुंबई परिसर
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
वादळी वारे + विजांचा कडकडाट + मध्यम ते मुसळधार पाऊस
पश्चिम महाराष्ट्र
पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, घाटमाथा
विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; सोलापुरात जोरदार पाऊस
मराठवाडा
छ. संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड
मुसळधार पावसासह विजा आणि वादळी वाऱ्यांचा अंदाज
उत्तर महाराष्ट्र
नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, नाशिक घाटमाथा
जोरदार पावसाची शक्यता
विदर्भ
गडचिरोली, यवतमाळ – वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अलर्ट
नागपूर, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, अकोला, गोंदिया, वाशिम – हलकासा पाऊस
काय काळजी घ्यावी?
घराबाहेर पडताना हवामान खात्याच्या अपडेट्स पाहा.
विजांच्या कडकडाटात झाडाखाली थांबू नका.
शेतकरी बांधवांनी शेती व उघड्यावर ठेवलेला माल सुरक्षित ठिकाणी हलवावा.
राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार
राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी, गरब्याचे आयोजन खुले मैदानात करताना हवामानाचा अंदाज पाहून निर्णय घ्यावा. मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

