MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Maharashtra
  • Maharashtra Rain Alert : राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज, वाचा हवामान खात्याचे अपडेट्स

Maharashtra Rain Alert : राज्यात पुढील तीन दिवस मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज, वाचा हवामान खात्याचे अपडेट्स

Maharashtra Rain Alert : राज्यात २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. २६ पासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव जाणवणार असून २७ सप्टेंबरला विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार आहे. 

1 Min read
Chanda Mandavkar
Published : Sep 23 2025, 08:51 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
पावसाचा अंदाज
Image Credit : Getty

पावसाचा अंदाज

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागानुसार, २२ ते २५ सप्टेंबरदरम्यान राज्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस होईल. हा पाऊस मुख्यतः दुपारनंतर पडणार आहे. २६ सप्टेंबरपासून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव वाढेल आणि २७ सप्टेंबरला विदर्भ, मराठवाडा, कोकण व मध्य महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पावसाचे प्रमाण अधिक होण्याची शक्यता आहे.

25
पावसाची तूट आणि अतिरेक
Image Credit : ANI

पावसाची तूट आणि अतिरेक

सातारा जिल्ह्यात पावसाची तूट आहे. तर सोलापूर, हिंगोली, धुळे, अमरावती, अकोला आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. उलट, काही भागांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

Related Articles

Related image1
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा कहर, 29 जिल्ह्यांना अलर्ट जारी
Related image2
Maharashtra Weather Alert: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाची शक्यता, राज्यातील 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट!
35
मुसळधार पावसाची नोंद
Image Credit : ANI

मुसळधार पावसाची नोंद

  • जळगावच्या पाचोरा येथे २४ तासांत १४३ मिमी पाऊस
  • जेऊर येथे १०५ मिमी, माढा येथे १२० मिमी
  • छत्रपती संभाजीनगरच्या पैठण येथे तब्बल २०० मिमी
  • धाराशीवमधील भूम येथे १६७ मिमी पावसाची नोंद
  • या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.
45
राज्यातील पावसाची स्थिती
Image Credit : Getty

राज्यातील पावसाची स्थिती

१ जून ते २२ सप्टेंबर या कालावधीत राज्यात सरासरी ९५३.२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. मात्र यावर्षी या कालावधीपर्यंत सरासरीपेक्षा १२ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला असून राज्याने १ हजार मिमीचा टप्पा ओलांडला आहे. १ ते २२ सप्टेंबर या कालावधीतच पावसाचे प्रमाण ३४ टक्के अधिक नोंदले गेले.

55
जादा पावसाचे जिल्हे
Image Credit : iSTOCK

जादा पावसाचे जिल्हे

पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव, लातूर, नांदेड, कोल्हापूर, वर्धा आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांमध्ये जूनपासून आत्तापर्यंत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
महाराष्ट्र बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Pune Municipal Election : जागावाटपावरून भाजप-शिवसेना यांच्यात तणाव, शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढणार?
Recommended image2
MHADA Lottery 2026 : म्हाडाची नवीन वर्षाची भेट! हजारो घरांची बंपर लॉटरी जाहीर; स्वस्तात घर मिळवण्यासाठी 'या' तारखेपूर्वी करा अर्ज!
Recommended image3
Pune News : सावधान! पुण्यात २ दिवस पीएमपीची चाके थांबणार; घराबाहेर पडण्यापूर्वी हे वाचाच!
Recommended image4
३१ डिसेंबरला रात्री किती वाजेपर्यंत पार्टी चालणार? बार, हॉटेल आणि वाईन शॉपसाठी राज्य सरकारचे नवीन 'डेडलाईन' नियम जाहीर!
Recommended image5
पुणे ट्रॅफिक अलर्ट: विजयस्तंभ कार्यक्रमामुळे 'हे' मुख्य रस्ते बंद; प्रवास करण्यापूर्वी नवा ट्रॅफिक प्लॅन नक्की पहा!
Related Stories
Recommended image1
Maharashtra Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा कहर, 29 जिल्ह्यांना अलर्ट जारी
Recommended image2
Maharashtra Weather Alert: नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मुसळधार पावसाची शक्यता, राज्यातील 30 जिल्ह्यांना यलो अलर्ट!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2025 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved