सार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी १ कोटींपेक्षा जास्त अर्ज आले असून, पहिला हप्ता १७ ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यात जमा होणार आहे. राज्यातल्या दोन ते अडीच कोटी महिलांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे.

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki bahin yojana) योजनेसाठी 1 कोटींपेक्षा जास्त अर्ज शासन दरबारी प्राप्त झाले असून या अर्जाचा ओघ अद्यापही कायम आहे. कारण राज्य सरकारने 15 ऑगस्टची मुदत वाढवून आता 31 ऑगस्टपर्यंत लाडक्या बहि‍णींना अर्ज करण्यासाठी मुभा दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण (Ladki bahin yojana) योजनेसाठी महिलांकडून (Women) मोठ्या प्रमाणात अर्ज केले जात आहेत. त्यातच आता लाडक्या बहि‍णींसाठी आणखी एक गुडन्यूज आली आहे. त्यानुसार, 17 ऑगस्ट रोजीच या योजनेचा पहिला हफ्ता 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे रक्षाबंधनापूर्वीच (Rakshabandhan) बहिणींना ओवाळणी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki bahin yojana) योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टलाच मिळणार असून याबाबत शासन दरबारी निर्णय झाला आहे. विशेष म्हणजे 17 ऑगस्ट रोजी राज्य सरकारकडून भव्य दिव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून हे पैसे वितरीत केले जाणार आहेत. बुधवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. या कार्यक्रमाला एकाच मंचावरती मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये पालकमंत्री या कार्यक्रमातून उपस्थित राहतील. 17 ऑगस्टला दोन ते अडीच कोटी महिलांना (Women) पहिला हप्ता देण्याच्या संदर्भामध्ये राज्य सरकारचा विचार असल्याचीही माहिती आहे. मात्र राज्य सरकारच्या या निर्णयामुळे योजनेसाठी पात्र झालेल्या महिला (Women) भगिनींना मोठा दिलासा मिळाला आहे.

तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर महिलांच्या आलेल्या अर्जांची आकडेवारी समोर येत आहेत. त्यामध्ये महिला भगिनींचे मंजूर अर्ज, प्रलंबित अर्ज आणि नामंजूर अर्जही देण्यात येत आहेत. तर प्रलिंबित अर्जांमधील काही त्रुटी दुरुस्त करुन ते मंजूर केले जाणार आहेत. तर नामंजूर करण्यात आलेल्या अर्जांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.

आणखी वाचा : 

लाडकी बहिणींना 'हा' दिवस शुभ, पहिला हप्ता 'या' दिवशी!

बांगलादेशच्या मुद्द्यावर मोदी का उपस्थित नव्हते? उद्धव ठाकरेंनी मांडला मुद्दा

वजन अपात्रतेनंतर विनेश फोगटला PM मोदींचे प्रोत्साहन, म्हणाले 'तू चॅम्पियन आहेस'