सार

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वजन जास्त असल्याने विनेश फोगटला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिला प्रोत्साहन देत 'चॅम्पियन' म्हटले आहे.

Vinesh Phogat Paris Olympics : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगटला मोठा धक्का बसला आहे. वजन जास्त असल्याने त्याला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र घोषित करण्यात आले आहे. यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी विनेशला प्रोत्साहन देत तू चॅम्पियन असल्याचे सांगितले.

 

 

विनेशला अपात्र ठरवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेशला धीर देणारे ट्वीट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, विनेश, तू चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहात आणि प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणा आहे. आज सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मला माहित आहे की, आव्हान स्वीकारणे हा तुझा स्वभाव आहे. तू मजबूतीने कमबॅक करशील असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही.

नेमका काय घडला प्रकार?

विनेश फोगाटचे वजन जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून रात्रभर हालचाली सुरु होत्या. मात्र बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. यानंतर विनेश फोगाटकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आता ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय पथकाकडून उर्वरित सामन्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.

आणखी वाचा :

कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर, भारताला मोठा धक्का

पॅरिस ऑलिम्पिकमधून विनेश फोगटला बाहेरचा रस्ता का दाखवला?