महाराष्ट्र विधान परिषदेच्या 4 जागांवर आज मतदान, मुंबईत ठाकरे गटाला भाजपाचे आव्हान असणार

| Published : Jun 26 2024, 09:41 AM IST / Updated: Jun 26 2024, 09:42 AM IST

Maharashtra MLC Election 2024

सार

महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी 26 जूनला मतदान पार पडत आहे. या जागांसाठीचा कार्यकाळ 7 जुलैला पूर्ण होणार आहे. गेल्या 30 वर्षांपासून मुंबई पदवीधर मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या शिवसेनेला यावेळी भाजपचे आव्हान असणार आहे.

Maharashtra MLC Polls Voting :  महाराष्ट्र विधान परिषदेच्या चार जागांसाठी 6 जूनला सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. या जागांमध्ये मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. असे सांगितले जातेय की, या चार जागांसाठीचा कार्यकाळ येत्या 7 जुलैला संपणार आहे. निवडणूक आयोगानुसार, चार जागांसाठी 22 जूनला उमेदवारी अर्ज मागवण्यात आले होते. याची मतमोजणी 26 मे रोजी होणार असून निकाल 1 जुलैला जाहीर केले जाणार आहेत.

मुंबईतील पदवीधर मतदार संघ
गेल्या 30 वर्षांमध्ये मुंबईतील पदवीधर मतदारसंघात दबदबा असणाऱ्या शिवसेनेला यंदा भाजपाचे आव्हान असणार आहे. या मतदारसंघात 8 उमेदवार मैदानात आहेत. पण खरी टक्कर ठाकरे गटातील अनिल परब यांच्या विरोधात किरण शेलार यांच्यामध्ये होणार असल्याचे मानले जात आहे.

मुंबईत 1 लाख 20 हजार 673 मतदार अनिल परब आणि किरण शेलार यांच्या भवितव्याचा निर्णय घेतील. अशातच अनिल परब यांनी आरोप लावलाय की, मुंबईतील पदवीधर मतदारसंघात 12 हजार पदवीधरांना सहभागी करण्यात आलेले नाही.

मुंबई शिक्षक मतदारसंघ
मुंबईत विभागातील शिक्षक मतदारसंघात एकूण 13 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यामध्ये ठाकरे गटाचे ज.मो. अभ्यंकर, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या गटातील शिवाजीराव नवावडे, भाजपाचे शिवनाथ दराडे, शिंदे गटातील शिवाजी शेंडगे आणि समाजवादी रिपब्लिक पार्टीचे सुभाष मोरे यांच्यामध्ये लढत होणार आहे.

कोकण पदवीधर मतदारसंघ
कोकण पदवीधर मतदारसंघात काँग्रेसचे रमेश कीर आणि भाजपाचे निरंजन डावखरे यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. निरंजन डावखरे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात काँग्रेसला जिंकणे थोडे आव्हानात्मक असणार आहे. असे सांगितले जातेय की, या मतदारसंघात एकूण 2 लाख 23 हजार 225 मतदार आहेत.

नाशिक पदवीधर मतदारसंघ
नाशिक पदवीधर मतदारसंघातून एकूण 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. असे सांगितले जातेय की, या ठिकाणी मुख्य लढत ठाकरे गटाचे संदीप गुलवे, शिंदे गटाचे किशोर दराडे आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्या गटातील महेंद्र भवसार यांच्यामध्ये होणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात एकूण 69 हजार मतदार आहेत.

आणखी वाचा : 

Pune Drug Scandal : अवैध पबवर बुलडोझर चालवा...पुण्यातील व्हायरल व्हिडीओनंतर मुख्यमंत्री एकनाश शिंदेंचे पोलिसांना आदेश

Devendra Fadnavis On Bank Crop Loan : पीककर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिल स्कोर मागू नका, देवेंद्र फडणवीसांची राष्ट्रीयकृत बँकांना तंबी