सार

पुढील 48 तासात मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यालाही पाऊस पडणार आहे.

 

मुंबई : भारतील हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात येत्या 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबई, ठाणेसह कोकणात दिवसभर उकाडा जाणवला असला, तरी पुढील काही तासात पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची रिपरिप पाहायला मिळू शकते. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 28 आणि 29 मे ला तुरळक ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.

 

 

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. भारतील हवामान विभागाच्या अंदाजानुसार, कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 29 मे ला कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचंही हवामान खात्याने सांगितलं आहे.

आणखी वाचा:

पालघर रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवरुन मालगाडीचे डबे घसरले, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत