पालघर रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवरुन मालगाडीचे डबे घसरले, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

| Published : May 28 2024, 07:17 PM IST / Updated: May 28 2024, 07:39 PM IST

western railway interrupt
पालघर रेल्वे स्थानकात रेल्वे ट्रॅकवरुन मालगाडीचे डबे घसरले, पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीची काही डबे रुळावरून घसरले. बोईसर स्थानकातून मुंबईच्या दिशेने येणारी मालगाडी घसरली. या अपघातामुळे पश्चिम रेल्वेची मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येणारी मालगाडी रुळावरून घसरली आहे. पालघर रेल्वे स्थानकात मालगाडीची काही डबे रुळावरून घसरले. बोईसर स्थानकातून मुंबईच्या दिशेने येणारी मालगाडी घसरली. या अपघातामुळे पश्चिम रेल्वेची मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.

मालगाडी घसरल्यामुळे पश्चिम रेल्वेची दोन्ही बाजूची वाहतूक विस्कळीत झाली आहे. गार्डचा डबा आणि आणखी सहा डबे रुळावरून घसरले आहे. अपघातानंतर रेल्वेचे गार्डही घटनास्थळी धावत आले असून संबंधित रेल्वे कर्मचाऱ्यांना मालगाडी पूर्ववत करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा:

मुंबईसह कोकणात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही कोसळणार