सार

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे आज (23 फेब्रुवारी) पहाटे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे. गुरुवारी जोशी यांना अत्यवस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Manohar Joshi Passed Away : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे. पी. डी. हिंदूजा रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉय चक्रवर्ती यांनी याची जोशी यांच्या निधनाची पुष्टी केली आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्ट्सनुसार, जोशी यांचा मुलगा उन्मेश याने म्हटले की, "त्यांना हृदयासंबंधित समस्या उद्भवल्याने आयसीयूत दाखल करण्यात आले होते आणि ते डॉक्टरांच्या निगराणीखाली होते. त्यांना दीर्घकाळापाससून आरोग्यासंबंधित समस्या निर्माण झाल्या होत्या. आम्ही शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करणार आहोत. तत्पूर्वी जोशी यांचे पार्थिव माटुंगा येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे."

मनोहर जोशी यांची प्रकृती मे 2023 पासून नाजूक होती. जोशी यांना जेव्हा ब्रेन हॅमरेज झाला त्यावेळी हिंदुजा रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले होते. तेथे काही दिवस कोमामध्ये होते. खरंतर, डॉक्टरांनी जोशी यांची प्रकृती सुधारण्यासंदर्भात फार कमी शक्यता व्यक्त केली होती. यामुळे त्यांना शिवाजी पार्क येथील निवासस्थानी आणण्यात आले आणि येथेच त्यांची काळजी घेतली जात होती.

मनोहर जोशी यांचा राजकीय प्रवास
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म 2 डिसेंबर 1973 रोजी महाड येथे झाला होता. जोशी यांनी मुंबईतील प्रतिष्ठित वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) मधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली होती.

जोशी यांचा राजकीय प्रवास राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून झाली होती. त्यानंतर जोशी शिवसेनेचे सदस्य झाले. वर्ष 1980 च्या दशकात, जोशी शिवसेनेत एक प्रमुख नेते म्हणून कार्य करू लागले. मनोहर जोशी यांना वर्ष 1995 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पद दिले गेले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची जागा घेतल्याने पहिल्यांदाच राज्यात शिवसेनेने सत्ता सांभाळली. 

आणखी वाचा : 

झिशान सिद्दीकीवर काँग्रेसची मोठी कारवाई, अखिलेश यादव यांना पक्षाने दिले यूथ काँग्रेसचे अध्यक्षपद

Ashok Chavan Join BJP : अशोक चव्हाणांचा देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश

Ashok Chavan Resigns : संजय निरुपम यांनी अशोक चव्हाणांनी काँग्रेस सोडण्यामागील सांगितले कारण, पक्षाच्या नेतृत्वावर उपस्थितीत केले प्रश्न