सार

बारामतीत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. 'तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात', असे पवार म्हणाले.

बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी बारामती तालुक्यात मेडद येथे कार्यकर्त्यांना उद्देशून केलेल्या विधानामुळे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. 'तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात', अशा शब्दांत त्यांनी निवेदने देणाऱ्या कार्यकर्त्यांना खडसावले.

अजित पवार बारामती तालुक्यात स्थानिक जनतेच्या समस्या आणि तक्रारी जाणून घेण्यासाठी आले होते. मेडद या ठिकाणी एका कार्यक्रमात त्यांच्या भाषणादरम्यान कार्यकर्ते वारंवार त्यांच्याकडे निवेदन घेऊन येत होते. भाषण सुरू असतानाच अजित पवार निवेदनं वाचत अधिकाऱ्यांना बोलावून ही कामे हात वेगळी करत होते आणि अधिकाऱ्यांना यामध्ये लक्ष घाला अशी सूचना करत होते. याच दरम्यान एका कार्यकर्ता बरीच महिने झाले हे काम झाले नाही असे म्हणत होता. सुरुवातीला पवार यांनी दुर्लक्ष केले, परंतु व्यत्यय सातत्याने होत राहिल्यावर ते चिडले आणि म्हणाले 'तुम्ही मते दिली म्हणजे माझे मालक नाही झालात. सालगडी करता काय मला.' असे अजित पवार म्हणाले आणि शांतता पसरली. त्यांचे हे वक्तव्य चर्चेचा विषय ठरले आहे.

आणखी वाचा-

वाल्मिक कराड सोबतचा फोटो व्हायरल; SIT मधून अधिकाऱ्याची उचलबांगडी