- Home
- Maharashtra
- महाराष्ट्रात 'थंडीचा कहर'! तापमान 'मायनस'मध्ये जाणार; 'या' ३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या शहराचं तापमान तपासा!
महाराष्ट्रात 'थंडीचा कहर'! तापमान 'मायनस'मध्ये जाणार; 'या' ३ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट, तुमच्या शहराचं तापमान तपासा!
Maharashtra Cold Wave Yellow Alert : महाराष्ट्रात विदर्भात थंडीचा कडाका वाढला असून, नागपूर आणि गोंदियामध्ये तापमान एक अंकी पातळीवर गेले आहे. हवामान विभागाने विदर्भातील ३ जिल्ह्यांसाठी शीतलहरीचा यलो अलर्ट जारी केला आहे.

महाराष्ट्रात पडणार बर्फासारखी थंडी!
मुंबई : महाराष्ट्रात तापमानातील चढ-उतार कायम असतानाच विदर्भात थंडीचं जबरदस्त आगमन झाले आहे. नागपूर आणि गोंदिया येथे तापमान एक अंकी पातळीवर गेले असून राज्यभर गारठ्याची चाहूल लागली आहे. हवामान विभागाने 6 आणि 7 डिसेंबर रोजी विदर्भात शीतलहरीचा इशारा दिला आहे. सकाळ-संध्याकाळ नागरिकांना बोचरी थंडीचा सामना करावा लागत असून काही भागात दुपारच्या वेळीही गारवा जाणवत आहे.
मुंबई : धुकं कायम, तापमान स्थिर
मुंबई आणि उपनगरांत 7 डिसेंबर रोजी धुक्यासह अंशतः ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
कमाल तापमान: 33°C
किमान तापमान: 21°C
थंडी अजूनही जोरदारपणे जाणवत नाही.
पश्चिम महाराष्ट्र : पुण्यात सकाळ-संध्याकाळ गारवा
पश्चिम महाराष्ट्रात तापमानात चढउतार सुरू आहेत.
पुण्यात निरभ्र आकाश व कोरडे वातावरण अनुभवायला मिळेल.
कमाल तापमान: 29°C
किमान तापमान: 14°C
मराठवाडा : संभाजीनगरसह सर्वत्र गारठा
मराठवाड्यातही ठणठणीत थंडी कायम.
छत्रपती संभाजीनगरमध्ये
कमाल तापमान: 29°C
किमान तापमान: 14°C
सकाळ-रात्री जास्त थंडी जाणवण्याची शक्यता.
उत्तर महाराष्ट्र : नाशिकमध्ये तापमान 12°C
उत्तर महाराष्ट्रातील थंडी सातत्याने वाढत आहे.
नाशिकमध्ये
कमाल तापमान: 29°C
किमान तापमान: 12°C
इतर शहरांतही तापमान 12°C च्या आसपास राहण्याचा अंदाज.
विदर्भ : 3 जिल्ह्यांना यलो अलर्ट, उमलली शीतलहरी
विदर्भात तापमानात मोठी घसरण झाली आहे. नागपूर आणि गोंदियामध्ये तापमान 9°C पर्यंत खाली गेले आहे. 7 डिसेंबरसाठी हवामान विभागाने या 3 जिल्ह्यांसाठी शीतलहरीचा यलो अलर्ट जारी केला आहे.
नागपूर
गोंदिया
यवतमाळ
या जिल्ह्यांमध्ये
कमाल तापमान: 28°C
किमान तापमान: 11–12°C
विदर्भात पुढील काही दिवस कडाक्याची थंडी जाणवण्याची शक्यता आहे.
आरोग्याची काळजी घ्या
थंडीमध्ये अचानक बदलणारे तापमान आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रक्तदाब-श्वसनाच्या समस्यांनी त्रस्त असणाऱ्यांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

