- Home
- Maharashtra
- मोठी बातमी! पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी 'डोकेदुखी'; सलग 3 दिवस सेवा ठप्प, 14 एक्स्प्रेस रद्द, अनेक गाड्यांना 'मेगा' विलंब!
मोठी बातमी! पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी 'डोकेदुखी'; सलग 3 दिवस सेवा ठप्प, 14 एक्स्प्रेस रद्द, अनेक गाड्यांना 'मेगा' विलंब!
Pune Mumbai Train Disruption : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात लोणावळा स्थानकाजवळ होणाऱ्या कामांमुळे ७, ८ आणि १० डिसेंबर रोजी पुणे-मुंबई रेल्वे वाहतूक विस्कळीत होणार आहे. या ब्लॉकमुळे इंटरसिटी, डेक्कन क्वीनसह १४ एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या.

पुणे–मुंबई रेल्वे सेवा तीन दिवस विस्कळीत
पुणे : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात महत्त्वाची कामे हाती घेण्यात येणार असल्यामुळे पुणे–मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक सलग तीन दिवस मोठ्या प्रमाणात बाधित होणार आहे. लोणावळा स्थानक परिसरातील यार्डचे रिमॉडेलिंग आणि आर अँड डी मार्गिकेचे विस्तारीकरण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ७, ८ आणि १० डिसेंबर रोजी विशेष ‘ब्लॉक’ जाहीर केला आहे. या कामाचा थेट परिणाम मेल–एक्स्प्रेससह लोकल सेवांवरही दिसून येणार आहे.
दोन दिवसांत 14 एक्स्प्रेस रद्द
या ब्लॉकदरम्यान अनेक नियमित व महत्त्वाच्या एक्स्प्रेस गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.
७ डिसेंबर (शनिवार)
पुणे–मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस
पुणे–मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस
या दोन्ही गाड्या रद्द राहतील.
८ डिसेंबर (रविवार)
या दिवशी तब्बल १२ गाड्यांची अप-डाउन सेवा थांबवण्यात आली आहे. यात इंटरसिटी, इंद्रायणी, डेक्कन एक्स्प्रेस, प्रगती एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन आणि सिंहगड एक्स्प्रेस यांसह पुणे–मुंबई मार्गावरील अनेक महत्त्वाच्या सेवा रद्द होणार आहेत.
लांब पल्ल्याच्या गाड्यांना उशीर
या ब्लॉकचा परिणाम लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही जाणवणार आहे. ६ आणि ७ डिसेंबर रोजी धावणाऱ्या पुढील गाड्यांना १ ते ३ तास उशीर होण्याची शक्यता आहे.
जोधपूर–हडपसर एक्स्प्रेस
ग्वाल्हेर–दौंड एक्स्प्रेस
मुंबई–भुवनेश्वर कोणार्क एक्स्प्रेस
मुंबई–सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस
मुंबई–हैदराबाद एक्स्प्रेस
पनवेल–नांदेड एक्स्प्रेस
याशिवाय राजकोट–कोईम्बतूर, कुर्ला–चेन्नई, पुणे–जयपूर आणि पुणे–एर्नाकुलम या गाड्यांनाही सुमारे ४५ मिनिटांचा विलंब अपेक्षित आहे.
प्रवाशांनी वेळापत्रकाची खात्री करूनच स्टेशनवर पोहोचावे
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की, प्रवासापूर्वी आपल्या गाडीच्या वेळापत्रकाची खात्री करूनच स्टेशनवर पोहोचावे.

