सार

"घर खरेदीसाठी मुद्रांक शुल्क योजना, नोकरदार महिलांना करातून सूट, शक्ती योजना आदी योजना राबवत आहोत. स्त्री समाजाचा केंद्रबिंदू होत आहे. महिला कुटुंब, अर्थार्जन अशा दोन्ही पातळीवर महिला काम करत आहेत. मुली परीक्षांमध्ये अव्वल असतात" असे पवार म्हणाले.

 

Maharashtra budget 2024 : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार शुक्रवारी 10 व्यांदा अर्थसंकल्प सादर करत आहेत. 2024-25 वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प ते सादर करत आहेत. यावेळी अजित पवार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केली. मागच्या काही दिवसांपासून या योजनेची चर्चा होती. मध्य प्रदेशच्या धर्तीवर ही योजना महाराष्ट्रात लागू करण्यात आली आहे. “महिलांना केंद्रस्थानी ठेवून आपण प्रगतीची वाटचाल सुरू केली आहे. महिला धोरण आपण जाहीर केले होते. त्यात वेळोवेळी बदल केले. नुकतेच अष्टसुत्री महिला धोरण जाहीर केले आहे. महिलांना पोषण आहार, रोजगार आणि कौशल्यासाठीच्या योजना राबवणार, लेक लाडकी योजना, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृयोजना आपण आणल्या” असं अजित पवार म्हणाले.

“घर खरेदी साठी मुद्रांक शुल्क योजना, नोकरदार महिलांना करातून सूट, शक्ती योजना आदी योजना राबवत आहोत. स्त्री समाजाचा केंद्रबिंदू होत आहे. महिला कुटुंब आणि अर्थार्जन अशा दोन्ही पातळीवर महिला काम करत आहेत. मुली परीक्षांमध्ये अव्वल असतात” असं अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत किती निधी मिळणार?

“महिलांच आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेत वय 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना शासनातर्फे दरमहा 1500 रुपये प्रदान करण्यात येतील. या योजनेसाठी दरवर्षी 46 हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल. जुलै 2024 पासून ही योजना लागू करण्यात येईल” असं अजित पवार म्हणाले.

1 कोटी 25 लाख 66 हजार घरांना नळजोडणी

“शुभमंगल सामूहिक विवाह योजनेतील अनुदान 10 हजार होते ते आता 25 हजार केले आहे. स्तन गर्भाशय कर्करोगाच्या निदानासाठी आरोग्य केंद्रात 78 हजार कोटी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जुन्या रुग्णवाहिकांच्या जागी नव्या रुग्णवाहिका देऊ. हर घर नल, हर घर जलसाठी 1 कोटी 25 लाख 66 हजार घरांना नळजोडणी दिली आहे. राहिलेल्या घरांचे काम प्रगतीपथावर आहे” असं अजित पवार म्हणाले.

आणखी वाचा :

Ashadhi Wari Palkhi Ceremony : 'ग्यानबा तुकाराम'च्या जयघोषात तुकोबांचे पंढरपूरकडे प्रस्थान, भक्तिमय वातावरणात वारकरी तल्लीन