सार
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभेची निवडणूक होणार आहेत. अशातच मावळ मतदारसंघात लाखो रुपयांचे घबाड एका कारमध्ये सापडल्याचे वृत्त समोर आले आहे.
Lok Sabha Election 2024 : देशभरात दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. यंदाची लोकसभा निवडणूक सात टप्प्यात होणार असून महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. अशातच पिंपरी चिंचवड (Pimpari-Chinchwad) येथील मावळ मतदारसंघात (Maval Lok Sabha Constituency) लाखो रुपयांचे घबाड सापडल्याचे वृत्त समोर आले आहे. एका कारमध्ये 29 लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील लाखो रुपयांची रक्कम इन्कम टॅक्स (Income Tax) विभागाकडे सोपवण्यात आली असून पुढील तपास केला जात असल्याचे सांगितले जातेय.
मावळ मतदारसंघात शिवसेना विरूद्ध शिवसेना
शिवसेनेत फूट पडल्यानंतर पक्षाचे दोन गट झाले आहेत. अशातच मावळ मतदारसंघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. निवडणुकीवेळी बारणे यांना भाजपासह उपमुख्यमंत्री अजीत पवार (Ajit Pawar) यांच्या पक्षाची साथ मिळणार आहे.
दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मावळ मतदारसंघातून संजोघ वाघेरे पाटील (Sanjog Waghere Patil) यांना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. संजोघ वाघेरे पाटील यांना निवडणुकीवेळी शरद पवारांचा गट आणि काँग्रेसचा पाठिंबा मिळणार आहे. अशातच मावळ मतदार संघात शिवसेना विरूद्ध शिवसेना अशी लढत होणार आहे.
राजकीय इतिहास
मावळ लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभेच्या जागा आहेत. यामध्ये पनवेल आणि चिंचवड विधानसभेच्या जागेवर भाजपा, मावळ आणि पिंपरी येथून राष्ट्रीय क्रांती पार्टी, कर्जतवर शिवसेना आणि उरणवर आयएनडीचे आमदार जिंकले आहेत. मावळ मतदारसंघात 22 लाख 98 हजार 80 मतदार आहेत. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या 12 लाख 3 हजार 588 असून महिला मतदारांची संख्या 10 लाख 94 हजार 453 एवढी आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ वर्ष 2008 मध्ये अस्तित्वात आला होता. यानंतर वर्ष 2009 मध्ये निवडणूक झाली.
महाराष्ट्रात 48 लोकसभा मतदारसंघ
उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात सर्वाधिक मतदारसंघ आहेत. उत्तर प्रदेशात 80 मतदारसंघ आहेत. तर महाराष्ट्रात 48 लोकसभेच्या जागांवर निवडणूक लढवली जात आहे. लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी 11 मतदारसंघासाठी होणार आहे.
मतदारसंघ
रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकंणगले येथे मतदान पार पडणार आहे.
चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी होणार आहे. यामधील मतदारसंघ पुढीलप्रमाणे-
नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी, बीड.
आणखी वाचा :
आदित्य ठाकरेंच्या 'त्या' विधानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साधला निशाणा, म्हणाले..…