सार

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीमधील जागा वाटपाबद्दल एक मोठे विधान केले आहे. नाना पटोले यांनी म्हटले की, येणाऱ्या दोन-तीन दिवसांमध्ये उमेदवारांची यादी जारी केली जाईल.

Lok Sabha Election 2024 :  महाराष्ट्रात महाविकास आघाडीमध्ये (MVA) जागा वाटपांचा तिढा अद्याप सुटलेला नाही. सांगलीतील (Sangali) जागेवरून सध्या महाविकास आघाडीमध्ये धूसफूस सुरू आहे. अशातच महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सोमवारी (18 मार्च) म्हटले की, लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी येणाऱ्या दोन-तीन दिवसात जारी केली जाईल. याशिवाय नाना पटोले यांनी काँग्रेसने सांगलीतील जागेवरून विशाल पाटील (Vishal Patil) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे.

विशाल पाटील यांना सांगलीतून तिकीट देण्याचा निर्णय
नाना पटोले यांनी म्हटले की, "काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसाठी विशाल पाटील यांना सांगलीच्या जागेवरून उतरवण्याचा निर्णय घेतला आहे." पश्चिम महाराष्ट्रातील सांगली लोकसभा जागेवर भाजपचे संजय काका पाटील विद्यमान खासदार आहेत. महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना (UBT Shiv Sena), काँग्रेस (Congress) आणि शरद पवारांच्या (Sharad Pawar's NCP) पक्षाचा समावेश आहे.

कोण आहेत विशाल पाटील?
विशाल पाटील हे राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. याशिवाय माजी खासदार प्रकाशबापू पाटील आणि महिला प्रदेश काँग्रेसच्या नेत्या शैलजा पाटील यांचे पुत्र आहेत. महाराष्ट्राच्या राजकरणात वसंतदादा पाटील यांचा वारसा विशाल पाटील यांनी कायम ठेवला आहे.

आणखी वाचा : 

लोकसभा निवडणुकीआधी राज ठाकरे दिल्लीत दाखल, NDA मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण

Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती

सर्वोच्च न्यायालयाने अजित पवारांच्या गटाला सुनावले, शरद पवारांचा फोटो आणि नाव वापरण्यास केली मनाई