सार

लोकसभा निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. अशातच भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये राज ठाकरे सहभागी होऊ शकतात अशा चर्चांना आता वेग आला आहे.

Lok Sabha Election  2024 : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) लोकसभा निवडणुकीआधी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये (NDA) सहभागी होण्याची चर्चा सुरू झाली आहे. असे म्हटले जातेय की, भाजप आणि एनडीदरम्यान युती संदर्भात चर्चा सुरू आहे. सोमवारी (18 मार्च) राज ठाकरे मुंबईहून दिल्लीत दाखल झाले.

सूत्रांनुसार, मनसेचे लक्ष दक्षिण मुंबई (South Mumbai) आणि शिर्डीच्या (Shirdi) जागेवर आहे. सध्या दिल्लीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेही (Chandrashekhar Bawankule) दिल्लीत आहेत. भाजप (BJP) आणि मनसे हे दोन्ही पक्ष हिंदूत्वाच्या विचारसणीवर विश्वास ठेवतात. अशातच मनसे आणि भाजपची युती होऊ शकते अशी चर्चा सुरू झाली आहे. वर्ष 2019 च्या लोकसभा निवडणूकीत राज ठाकरे यांनी आपले उमेदवार उतरवले नव्हते. पण राज्याच ठिकठिकाणी जाऊन भाजपच्या विरोधात प्रचार केला होता.

सातत्याने मनसे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी होतायत
काही दिवसांआधी मनसे पक्ष एनडीमध्ये सहभागी होण्याची चर्चा सुरू झाली होती. यावेळी मुंबईतील भाजप प्रमुख आशीष शेलार यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. याआधीही फेब्रुवारी महिन्यात मनसेच्या नेत्यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. त्यावेळी सूत्रांनी सांगितले होते की, मनसे नेत्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली आहे.

भाजप आणि मनसेची युती झाल्यास.…
सूत्रांकडून असेही सांगितले जातेय की, राज ठाकरे यांनी सीट शेअरिंगची जबाबदारी आपल्या तीन विश्वासू नेत्यांवर सोपवली आहे. राज ठाकरे भाजपशी चर्चा करत आहेत. अशातच भाजप आणि मनसेमध्ये युती झाल्यास सर्वाधिक फायदा मनसेलाच होणार आहे. कारण महाराष्ट्रात मनसेच्या मर्यादित जागा आहेत.

आणखी वाचा : 

Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती

Electoral Bonds : निवडणूक रोख्यांची लपवाछपवी न करता संपूर्ण माहिती SBI ने द्यावी, सुप्रीम कोर्टाचे बँकेला आदेश

ईडीकडून काँग्रेसमधील दिग्गज नेत्याची चौकशी केली जाणार, 20 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यासंबंधित प्रकरण