Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात पंतप्रधान मोदींची सभा, रोड शो चेही आयोजन

| Published : Apr 23 2024, 12:41 PM IST

Narendra Modi Road show in UP

सार

महायुतीच्या जिल्ह्यातील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा २९ एप्रिल रोजी जाहीर सभेबरोबरच पुण्यात ‘रोड शो’ होणार आहे.अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.. 

पुणे लोकसभेचे महायुतीचे भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, तसेच बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार तसेच पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिनांक २९ एप्रिल रोजी पुण्यात येणार आहेत. यावेळी मोदींचा रोड शो होणार असून त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एस. पी. कॉलेजच्या मैदानात जाहीर प्रचारसभा देखील होणार आहे. या सभेत पंतप्रधान मोदी काय बोलणार आणि पुण्याच्या विकासावर काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे.

महायुतीच्या बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या खडकवासला येथील निवडणूक कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी अजित पवार यांनी ही माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी आधी कात्रज एनडीए येथील मैदान तसेच नंतर खडकवासल्यामध्ये जागेची चाचपणी करण्यात आली होती. मात्र, प्रशस्त मैदान नसल्याने स. प. महाविद्यालयाच्या मैदानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेची तयारी सुरू झाली आहे. या सभेपूर्वी पुण्यात रोड शो देखील होणार आहे. पुण्यातील एस. पी. कॉलेजच्या मैदानावर चाळीस हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था होऊ शकते. यासाठी येथील जागेवर ही सभा होणार आहे. पुण्यातील मोदींचा रोड शोचा मार्ग अद्याप स्प्ष्ट केलेला नाही. तसेच जाहीर प्रचारसभेकडे संपूर्ण देशाचे लक्ष असणार आहे.

पुण्यात या दिवशी मतदान :

पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. तर बारामती मध्ये ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार बारामती लोकसभा मतदार संघात खडकवासला येत असल्यानं राष्ट्रवादीने खडकवासला या ठिकाणी सभा घेण्याचे नियोजन केले होते होते . मात्र पुण्यातील मुख्य भागी होत आहे.

Read more Articles on