- Home
- Maharashtra
- Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यात आले नाहीत? घाबरू नका, ह्या स्टेप्स फॉलो करा!
Namo Shetkari Yojana: नमो शेतकरी सन्मान योजनेचे 2000 रुपये तुमच्या खात्यात आले नाहीत? घाबरू नका, ह्या स्टेप्स फॉलो करा!
Namo Shetkari Yojana: महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा सातवा हप्ता वितरित झाला आहे. ९१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना १८९२ कोटी रुपये जमा झाले आहेत. पैसे न मिळाल्यास, स्टेटस तपासा आणि तहसील कार्यालयाशी संपर्क साधा.

मुंबई: नमो शेतकरी महासन्मान योजना (Namo Shetkari Yojana) ही महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी योजना असून राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत आहे. नुकताच या योजनेचा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला आहे. पण काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप पैसे जमा झालेले नाहीत. अशा परिस्थितीत नेमके काय करावे? याची सविस्तर माहिती खाली दिली आहे.
शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा सातवा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरित करण्यात आला. यावेळी राज्यातील ९१ लाख ६५ हजार १५६ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण १८९२.६१ कोटी रुपये निधी जमा करण्यात आला.… pic.twitter.com/dO7kIv4IFs
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 9, 2025
या योजनेअंतर्गत किती रक्कम मिळते?
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी ₹6,000 दिले जातात.
महाराष्ट्र शासनाने त्यात भर घालून, नमो शेतकरी महासन्मान योजनेतर्फे आणखी ₹6,000 देण्याची घोषणा केली आहे.
म्हणजेच एकूण ₹12,000 प्रतिवर्ष शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात जमा केले जातात.
आतापर्यंत किती हप्ते वितरित झाले?
आजवर या योजनेचे सहा हप्ते वितरित झाले असून, 93 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना ₹11,130 कोटी इतकी मदत मिळाली आहे. आज सातवा हप्ता अधिकृतपणे वितरित करण्यात आला आहे.
जर तुमच्या खात्यात पैसे आले नाहीत तर काय करावे?
1. तुमचा लाभार्थी स्टेटस तपासा
Namo Shetkari Yojana Status List तपासण्यासाठी खालीलपैकी एक पर्याय वापरा:
मोबाईल नंबर
नोंदणी (Registration) नंबर
त्यानंतर Captcha Code टाका आणि "Get Data" वर क्लिक करा.
येथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती, तसेच आतापर्यंत जमा झालेल्या हप्त्यांची माहिती दिसेल.
2. तहसील कार्यालयात भेट द्या
जर स्टेटसमध्ये काही अडचण दिसत असेल किंवा पैसे जमा झाले नसतील, तर:
तुमच्या तहसील कार्यालयातील PM-KISAN कक्षाशी संपर्क साधा.
संबंधित अधिकारी तुमची तक्रार नोंदवतील.
काही आवश्यक कागदपत्रांची मागणी केली जाऊ शकते.
ती कागदपत्रे सादर करून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सातवा हप्ता वितरित
सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी मंत्रालयात कृषी विभागाच्यावतीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित होते:
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री अजित पवार
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे
मुख्यमंत्री कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी
जर तुम्ही PM-KISAN योजनेचे लाभार्थी असाल, तर नमो शेतकरी योजनातही तुमची नोंदणी होणे आवश्यक आहे. पैसे जमा झाले नसतील, तर तात्काळ स्टेटस तपासा व तहसील कार्यालयाशी संपर्क करा. लवकरच तुमच्या खात्यात शेतकरी सन्मान योजनेचे पैसे जमा होतील.

