ही भरती आरोग्य, अभियांत्रिकी, प्रशासन, उद्यान, अग्निशमन व इतर विविध विभागातील पदांसाठी असून, इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ जुलै २०२५ ही आहे.
कल्याण - कल्याण-डोंबिवली महापालिकेने (KDMC) गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील एकूण ४९० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही भरती आरोग्य, अभियांत्रिकी, प्रशासन, उद्यान, अग्निशमन व इतर विविध विभागातील पदांसाठी असून, इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३ जुलै २०२५ ही आहे.
एकूण रिक्त पदे: ४९०
पदनिहाय तपशील व पात्रता (मुख्य पदे):
क्रमांक पदाचे नाव जागा शैक्षणिक पात्रता
1) फिजिओथेरपिस्ट 02
शैक्षणिक पात्रता : (i) MPTH (फिजिओथेरपी अॅण्ड रिहॅबिलीटेशन) (ii) 02 वर्षे अनुभव
2) औषधनिर्माता 14
शैक्षणिक पात्रता : (i) B.Pharm (ii) 02 वर्षे अनुभव
3) कुष्ठरोग तंत्रज्ञ 03
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल लेप्रसी टेक्निशियन कोर्स (iii) 02 वर्षे अनुभव
4) स्टाफ नर्स 78
शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc (Nursing) किंवा 12वी उत्तीर्ण+GNM (ii) 02 वर्षे अनुभव
5) क्ष-किरण तंत्रज्ञ 06
शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc (Physics) (ii) रेडिओग्राफी डिप्लोमा (iii) 02 वर्षे अनुभव
6) हेल्थ व्हिजीटर ॲण्ड लेप्रसी टेक्निशियन 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) कुष्ठरोग तंत्रज्ञ कोर्स
7) मानस उपचार समुपदेशक 02
शैक्षणिक पात्रता : (i) MA (Clinical Psychology/Counseling Psychology) (ii) 02 वर्षे अनुभव
8) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 01
शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc (Physics/ Chemistry/ Biology/ Botany/ Zoology/ Microbiology) (ii) DMLT (iii) 02 वर्षे अनुभव
9) लेखापाल / वरिष्ठ लेखा परिक्षक 06
शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव
10) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 58
शैक्षणिक पात्रता : स्थापत्य (Civil) अभियांत्रिकी पदवी
11) कनिष्ठ अभियंता (विद्युत) 12
शैक्षणिक पात्रता : विद्युत (Electrcial) अभियांत्रिकी पदवी
12) कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) 08
शैक्षणिक पात्रता : यांत्रिकी (Mechanical) अभियांत्रिकी पदवी
13) चालक-यंत्रचालक (ड्रायव्हर कम ऑपरेटर) 12
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स (iii) 03 वर्षे अनुभवासह जड वाहनचालक परवाना
14) अग्निशामक (फायरमन) 138
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) 06 महिन्यांचा अग्निशमन कोर्स
15) कनिष्ठ विधी अधिकारी 02
शैक्षणिक पात्रता : (i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
16) क्रीडा पर्यवेक्षक 01
शैक्षणिक पात्रता :(i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) BPEd (iii) SAI कडील डिप्लोमा (iv) 03 वर्षे अनुभव
17) उद्यान अधिक्षक 02
शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी. (ii) 03 वर्षे अनुभव
18) उद्यान निरीक्षक 11
शैक्षणिक पात्रता : B.Sc. (Horticulture) किंवा कृषी/ बॉटनी/ फॉरेस्ट्री/ वनस्पती शास्त्रातील पदवी
19) लिपिक-टंकलेखक 116
शैक्षणिक पात्रता : (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
20) लेखा लिपिक 16
शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) संगणकावर मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी 40 श.प्र.मि.
21) आया (फिमेल अटेंडेंट) 02
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य संस्था/मान्यवर ट्रस्ट किमान 50 बेड असलेल्या खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान 02 वर्षाचा अनुभव आवश्यक.
इतर सर्व पदांसाठी सविस्तर पात्रता mahacityjobs.com किंवा KDMC च्या अधिकृत वेबसाइटवर पाहता येईल.
परीक्षा शुल्क:
- खुला प्रवर्ग : ₹1000/-
- मागासवर्गीय/अनाथ : ₹900/-
- माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक : शुल्क माफ
वयोमर्यादा (१ जुलै २०२५ रोजी):
- सामान्य प्रवर्ग: १८ ते ३८ वर्षे
- मागासवर्गीय/अनाथ : ५ वर्षे सवलत
वेतनश्रेणी: ₹15,000/- ते ₹1,22,800/- प्रतिमाह
नोकरीचे ठिकाण: कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्द
निवड प्रक्रिया:
लिखित परीक्षेच्या गुणांच्या आधारे निवड.
किमान गुण:
- खुला प्रवर्ग : किमान ५०%
- मागासवर्गीय : किमान ४५%
परीक्षेनंतर गुणवत्ता यादी व Normalization गुण KDMC च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध होतील.
अर्ज प्रक्रिया:
अर्ज ऑनलाईन पद्धतीने KDMC Official Website वर करावा.
अंतिम मुदत : ०३ जुलै २०२५
संपर्क (अर्जात अडचण आल्यास):
TCS टेक्निकल हेल्पलाइन: ०२२-६१०८७५१९
KDMC भरती माहिती: ०२५१-२३०३०६० (सोम-शनि, सकाळी १० ते संध्या ६)
ईमेल: kdmcrecruitment2025@gmail.com
इच्छुक उमेदवारांनी आपले शैक्षणिक व अनुभव प्रमाणपत्रे तयार ठेवावीत आणि वेळेत अर्ज सादर करावा. अधिकृत जाहिरात, अभ्यासक्रम व भरतीशी संबंधित सर्व अपडेट्ससाठी KDMC वेबसाइटला नियमितपणे भेट द्यावी.


