- Home
- Maharashtra
- Palkhi Pune : “ज्ञानोबा माऊली, तुकाराम, ज्ञानोबा माऊली, तुकाराम” असा हरिनामाचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पुण्यात दाखल
Palkhi Pune : “ज्ञानोबा माऊली, तुकाराम, ज्ञानोबा माऊली, तुकाराम” असा हरिनामाचा जयघोष करत संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पुण्यात दाखल
पुणे - संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या यांच्या पालखी आज शुक्रवारी पुण्यात दाखल झाल्या. पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम , अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी.(ई), अतिरिक्त आयुक्त (ज) एम. जे.प्रदीप चंद्रन यांनी स्वागत केले.

“ज्ञानोबा माऊली, तुकाराम, ज्ञानोबा माऊली, तुकाराम” असा हरिनामाचा जयघोष करत संत ज्ञावेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी पुण्यात दाखल
यावेळी पोलिसांनीही पालखीत ताल धरला. संगमवाडी येथून पुण्यात स्वतंत्र ठिकाणी दोन्ही पालख्या विसावतात आणि रविवारी हडपसर मधून या पालख्या वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरकडे मार्गस्थ होतील. त्यानंतर या पालख्या वाखरी गावात एकत्र येतात. त्यामुळं आजचा दिवस या दोन्ही पालख्या आणि वारकाऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो.
संत तुकाराम महाराज पालखीचे पुण्यात आगमन
पिंपरी-चिंचवड शहरातील भक्तिभावाने नटलेल्या वातावरणात, आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरातून सकाळी ६ वाजता संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली. शहरातील नाना पेठेतील निवडुंगा विठ्ठल मंदिरात पालखीने दोन दिवसांचा मुक्काम घेतला आहे. याठिकाणी सायंकाळी भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखीनेही पुण्यात घेतला विसावा
त्याचवेळी, आळंदी येथील गांधी वाड्यातून सकाळी ६ वाजता संत ज्ञानेश्वर माउलींची पालखी पुण्याच्या दिशेने प्रस्थान करून भवानी पेठेतील विठोबा मंदिरात पोहोचली. पालखीच्या स्वागतासाठी शहरभर टाळ-मृदुंग आणि हरिनामाचा निनाद ऐकायला मिळाला.
भर पावसातही हरिनामाचा गजर
तुफान पावसातही वारकऱ्यांचा उत्साह काहीसा कमी झालेला नव्हता. पावसाच्या सरी अंगावर घेत 'ज्ञानोबा-तुकाराम' असा जयघोष करत वारकरी फुगड्या खेळताना, फेर धरताना आणि नामस्मरणात तल्लीन झाल्याचे दृश्य पुणेकरांनी अनुभवले.
आयुक्त शेखर सिंह पारंपरिक वेशभूषेत सहभागी
पिंपरी-चिंचवडचे आयुक्त शेखर सिंह यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत अभंग गात पालखी सोहळ्यात सहभाग घेतला. त्यांच्या या भक्तिभावपूर्ण उपस्थितीमुळे जमलेल्या भाविकांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
व्यवस्थापनाची चोख तयारी
पालखी सोहळ्यादरम्यान पिण्याच्या पाण्याचे टँकर, रुग्णवाहिका, अग्निशमन यंत्रणा आदी आपत्कालीन सेवा तैनात करण्यात आल्या होत्या. सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त व स्वयंसेवक सज्ज होते.
आळंदीत दर्शनासाठी गर्दी
दुसरीकडे, संत ज्ञानेश्वर माउलींच्या समाधीस्थळी भाविकांनी पावसात उभे राहत दर्शन घेतले. महाद्वारावर पासशिवाय प्रवेश बंद करण्यात आला असून विशेष रांगा लावून व्यवस्था करण्यात आली होती. परिसरात वारकऱ्यांचा अखंड हरिनाम सुरू असून, आषाढी वारीच्या पावित्र्यपूर्ण वातावरणाने संपूर्ण शहर भक्तिरसात न्हालं आहे.
पुढील मार्गक्रमण
रविवारी, २४ जून रोजी हडपसर येथून दोन्ही पालखी स्वतंत्र मार्गाने पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवतील. वाखरी येथे त्या पुन्हा एकत्र येणार असून, आषाढी एकादशीपूर्वी पंढरपुरात पोहोचतील.
सांस्कृतिक परंपरेचे जिवंत उदाहरण
वारकरी संप्रदायाचा हा भक्तिभाव, शिस्तबद्धतेचा व सामाजिक ऐक्याचा अद्वितीय सोहळा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे जिवंत उदाहरण ठरतो.
पुणेकरांकडून उत्साहात स्वागत
दोन्ही पालखी पुण्यात दाखल झाल्या तेव्हा त्यांचे पुणेकरांनी उत्साहात स्वागत केले. ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या.
हजारो भाविक सहभागी
अनेक लहान-मोठ्या दिंडी या पालखींसोबत चालत आहेत. त्यात हजारोंच्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत.
पुण्यात असेल मुक्काम
शनिवारी दोन्ही पालखींचा पुण्यात मुक्काम असेल. यावेळीही भाविकांनी दर्शनाची संधी मिळणार आहे.
रविवारी हडपसरला
रविवारी पालखी हडपसरला पोहोचतील. यावेळी हडपसरच्या नागरीकांना पालखींच्या स्वागताची संधी मिळेल.
भगवी पताका
यावेळी पुरुषांनी खांद्यावर भगवी पताका तर महिलांनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते.

