आमदार रोहित पवार यांनी पंढरपूर येथे शेतकरी कर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली असून, रक्तातील साखर कमी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. तरीही, जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

रोहित पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर आंदोलन सुरु केलं आहे. त्यांनी कालपासून म्हणजेच १२ जूनपासून हे आंदोलन पंढरपूर येथे सुरु केलं. आज त्यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. रोहित पवार यांनी मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन मागं घेणार नसल्याचं सांगितलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

रोहित पवार काय म्हणाले?

आम्हीही जिद्दी आहोत. जोपर्यंत कर्जमाफीमधील अटी निघत नाही आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्यांना मिळत नाही, तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन मागे घेणार नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीतील अटी जाचक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

रोहित यांची तब्येत खालावली?

रोहित पवार यांची तब्येत खालावल्याची माहिती समोर आली आहे. डॉक्टरांच्या पथकाकडून त्यांची वैद्यकीय पथकाकडून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यांची तब्येत ढासळत होत असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं आहे. रोहित पवार यांच्या रक्तातील साखर कमी झाली असून ती ८३ वर साखर आली आहे.

रोहित पवार यांची काय मागणी

रोहित पवार यांनी दोन लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी देण्यात यावी अशी मागणी रोहित यांनी केली आहे. शेतकऱ्यांसाठी सवलतीच्या अटी मागण्या मान्य करण्यात यावेत, शेतकऱ्यांसाठी एक रुपयातील पीकविमा योजना सुरू करावी, अशीही मागणी केली आहे. आंदोलक शेतकऱ्यांना न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

विखे पाटील यांनी केली टीका

राधाकृष्ण विखे यांनी यावेळी रोहित पवार यांच्यावर टीका केली आहे. हे आंदोलन रोहित यांच्या राजकीय अस्तित्वासाठी हि लढाई सुरु असल्याचं विखे यांनी म्हटलं आहे. भाजपच्या काही नेत्यांनीही हे आंदोलन राजकीय हेतूने सुरु असल्याचं म्हटलं आहे.