अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी तंबाखू, गुटखा विक्रेते आणि अन्न भेसळ करणाऱ्यांवर कारवाईचा धडाका लावला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी त्यांच्या कारवाईचे स्वागत करत भेसळ करणाऱ्यांवर मकोका लावण्याची मागणी केली आहे. तसेच, रुग्णालयातील फार्मसीमधून औषधे खरेदी करणे बंधनकारक नसल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे अधिकारी तुकाराम मुंडे यांनी आपल्या कारवाईचा धडाका लावला आहे. त्यांनी आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यावर धडक कामगिरी करायला सुरुवात केली. तसेच यापुढे तंबाखू, गुटखा आणि तत्सम पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांवर धडक कारवाई केली जाईल असं सांगितलं. तुकाराम मुंडे यांच्या या कामगिरीमुळं विक्रेते घाबरून गेले आहेत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

छगन भुजबळ काय म्हणाले? 

यावेळी छगन भुजबळ यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी बोलताना म्हटलं आहे की, तुकाराम मुंडे हे चांगली कामगिरी करत असून त्यांच्या या धडक कारवाईचे आपण स्वागत करायला हवं. यावेळी भुजबळ यांनी कॉल करून अन्न आहे त्याच्यात भेसळ होत असेल तर नक्कीच कडक कारवाई करा असं मुंडे यांना सांगितल्याचं म्हटलं आहे.

मकोका लावायलाच पाहिजे 

या अन्नात भेसळ करणाऱ्यांवर मकोका लावायलाच पाहिजे असं ठामपणे भुजबळ यांनी यावेळी म्हटलं आहे. तुम्हाला माहित असून तुम्ही भेसळयुक्त जेवण देऊन लोकांच्या जीवाशी खेळता असं भुजबळ यांनी म्हटलं आहे. अशा लोकांवर कारवाई करायला हवी आणि ती कडक स्वरूपातील हवी असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

ठराविक मेडिकलमधूनच औषधे घेऊ नका 

आपण ठराविक मेडिकलमधून औषधे घेऊ नका असं यावेळी मुंडे यांनी बोलताना म्हटलं आहे. रुग्णालयातील फार्मसीमधून औषधे खरेदी करणे बंधनकारक नाही आणि कुठून औषधे घ्यायची याचा अधिकार रुग्णाच्या नातेवाईकांचा असल्याचं यावेळी मुंडे यांनी म्हटलं आहे. या आदेशाचे जे पालन करणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं मुंडे यांनी म्हटलं आहे.