महाराष्ट्रात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून लवकरच पुन्हा सक्रिय होणार असून १९ ते २५ जून दरम्यान विदर्भासह मध्य भारतात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रात अनेक दिवसांपासून पाऊस होत नाही. शेतकरी राजा आकाशाकडे नजर लावून बसला आहे पण अजूनही पाऊस झालेला नाही. भारतीय हवामान विभागाने पावसाच्या बाबत माहिती दिली आहे. आता मान्सून परत लवकरच सक्रिय होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पाऊस कधी होणार?
पाऊस लवकरच होणार असल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं आहे. मध्य भारतात पाऊस येऊन आकाशात ढग हळूहळू पुन्हा जोर धरू लागणार आहे. त्यामुळं महाराष्ट्रासोबतच इतर ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात पाऊस पडणार
आता विदर्भात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. १९ जून ते २५ जून या तारखेच्या दरम्यान छत्तीसगढ, पूर्व मध्य प्रदेश, पश्चिम मध्य प्रदेश आणि विदर्भ अशा ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून संथ गतीने कोसळत असल्यामुळं तो पश्चिम भागात लवकरच पोहचेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ढगांचे पुनरागमन महत्वाचं
ढगांचे पुनरागमन आता अतिशय महत्वाचं ठरणार आहे. मान्सूनचे आगमन होऊनही पाऊस न झाल्यामुळं महाराष्ट्रातील शेतकरी चिंतातुर झाला आहे. महाराष्ट्रासह राज्यातील इतर भागात लवकरच पाऊस कोसळेल असं सांगण्यात आलं आहे. २१ ते २३ जून दरम्यान वादळी वाऱ्यांसह पाऊस होऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे.


