पवनराजे निंबाळकर हत्याकांडात सर्व आरोपी निर्दोष सुटल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेना ठाकरे गटात फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर, ते शिंदे गटात जाणार की ठाकरेंसोबत राहणार याबाबत संभ्रम वाढला असून ते लवकरच निर्णय घेणार आहेत.

शिवसेना ठाकरे गटात परत एकदा फूट पडली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे ९ पैकी ६ खासदार फुटले असून ते आता कुठं जातात याकडं लक्ष लागून राहील आहे. शनिवारी म्हणजे आज पवनराजे निंबाळकर यांच्या हत्याकांडाचा निकाल लागला आहे. या हत्याकांडातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका होणार असून ओमराजे निंबाळकर यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

ओमराजे काय करणार? 

ओमराजे निंबाळकर यांनी मी मतदारसंघात जाऊन चर्चा करेल आणि नंतर निर्णय घेईल असं सांगितलं आहे. त्यांनी लोकांशी बोलून पुढील निर्णय घेणार असल्याचं सांगितलं. मात्र आता ओमराजे यांनी अशी भूमिका घेतल्यामुळं शिवसेना शिंदे गटाचे टेन्शन नक्कीच वाढलं आहे. या सर्व प्रकरणातील घडामोडी आता वेगवान घडत असल्याचं दिसून आलं.

पुणे शहरप्रमुखांनी घेतली ओमराजे यांची भेट 

पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी आज निंबाळकर यांची भेट घेतली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या हत्या प्रकरणाचा निकाल लागला. त्यामुळं भेट घेतल्याचं नाना यांनी म्हटलं आहे. ओमराजे मतदारसंघात जातील आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून निर्णय घेतील असं यावेळी बोलताना नाना भानगिरे यांनी म्हटलं आहे.

संभ्रम वाढला 

मात्र यामुळं लोकांमधील संभ्रम वाढला आहे. ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात कधी प्रवेश करतील याकडं मात्र आता सर्वांचं लक्ष लागून राहील आहे. ओमराजे निंबाळकर हे शिंदे गटात जातात की उद्धव ठाकरे यांच्याकडेच राहणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. जिथं बंडखोरी झाली त्या ठिकाणी उद्धव ठाकरे हे स्वतः जाऊन भेट घेणार आहेत.