सार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या उपनेत्याच्या मुलाने केलेल्या घटनेमुळे सगळं वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणात आरोपी मिहीर शहा आणि ड्रायव्हर हे दोघेही गाडीमध्ये उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. शहा याच्या गाडीने एका महिलेला चिरडले आहे.

सध्याच्या घडीला हिट अँड रनच्या केसेस दिवसेंदवस वाढत चालले असल्याचे दिसून आले आहे. वरळीमध्ये घडलेली एक घटना समोर आली असून त्यामुळे सगळं वातावरण ढवळून निघाल आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या उपनेत्याच्या मुलाने केलेल्या घटनेमुळे सगळं वातावरण ढवळून निघालं आहे. या प्रकरणात आरोपी मिहीर शहा आणि ड्रायव्हर हे दोघेही गाडीमध्ये उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. शहा याच्या गाडीने एका महिलेला चिरडले आहे. 

अपघातानंतर काढला घटनास्थळावरून पळ - 
अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरून आरोपीने पळ काढला. शहा याच्या गाडीने एका महिलेला चिरडल्यानंतर तो या घटनास्थळावरून गायब झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उपनेते पालघरचे उपनेते राजेश शहा यांच्या मुलाने य घटनास्थळावरून पळ काढल्याचे लक्षात आले आहे. अपघात झाल्यानंतर हा शहा मैत्रिणीच्या घरी गेला होता आणि तिथून तो मित्राकडे जातो म्हणून म्हटला आणि असं सांगितले आहे. 

यावेळी झालेल्या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. कोळी कुटुंब मासे विक्री करण्यासाठी चालले होते. त्यांना या शहा याच्या गाडीने ठोकल्यानंतर नवरा सावध होऊन बाजूला झाला. बाजूला झाल्यानंतर असं झाले की त्यांची बायको गाडीच्या बोनेटवर आली होती. यावेळी ड्रायव्हर घाबरून गेल्यानंतर गाडी जोरात चालवून बाईला ओढत नेले. त्यामुळे बाईचा दवाखान्यात नेल्यानंतर जागेवर मृत्यू झाला.