सार

पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. अपघाताच्या रात्री आरोपीसोबत ड्रायव्हर असल्यामुळे त्याला आजोबानी धमकावून जबाब बदलण्याबाबत सांगितले होते. 

पुणे पोर्शे प्रकरणातील नवीन घटना रोज समोर येताना दिसून येत आहेत. अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस मित्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुरेंद्र अगरवाल यांनी ड्रायव्हरला धमकावून त्याला घरी येऊ न दिल्यामुळे ही अटक करण्यात आली आहे. ड्रायव्हरने तक्रार दाखल केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. 

ड्रायव्हरने केली तक्रार दाखल - 
ड्रायव्हर सुरेंद्र अगरवाल यांच्या विरोधात ड्रायव्हरने पोलिसात तक्रार दाखल केली असून त्या आधारे सुरेंद्र अगरवाल यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 365, 366 आणि आयपीसीच्या इतर कलमांखाली गुन्हा दाखल केला जाईल. पोलिसांनी या झालेल्या घटनेवर प्रतिक्रिया दिली असून यामध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली आहे. 

पोलीस आयुक्त अमितेश कुमार काय म्हणाले? -
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यावर बोलताना सांगितले आहे की, ड्रायव्हर गाडी चालवत नव्हता हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दुसऱ्या अधिकाऱ्याने याबाबत माहिती देताना सांगितले आहे की, “अपघातानंतर, अल्पवयीन आरोपीचे आजोबा आणि वडिलांनी कथितपणे ड्रायव्हरचा फोन काढून घेतला आणि 19 मे ते 20 मे या कालावधीत त्यांना त्यांच्या बंगल्याच्या आवारात ओलीस ठेवले. चालकाच्या पत्नीने त्याची सुटका केली. न्यायालयाने अल्पवयीन आरोपीला 14 दिवस बाल सुधारगृहात पाठवले आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल याला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे, याबद्दलची माहिती अमितेश कुमार यांनी दिली आहे. 
आणखी वाचा - 
Mumbai Water Cut: मुंबईत पाणीकपात जाहीर, 30 मेपासून पाण्याचा पुरवठा कमी होणार
Dombivli MIDC Blast: डोंबिवली स्फोटावर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “घटना…”