बदलापूर प्रकरणात SIT चौकशीचे आदेश, गृहमंत्री फडणवीस यांची घोषणा

| Published : Aug 20 2024, 01:59 PM IST / Updated: Aug 20 2024, 04:34 PM IST

Sachin Tendulkar, Devendra Fadnavis, Maha Vikas Aghadi, farmer protests, farmer protests, farmers

सार

बदलापूर अत्याचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली असून, IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली हे SIT काम करेल.

बदलापूर अत्याचार प्रकरणात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून या बाबतचे ट्विट करण्यात आले आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी मंगळवारीच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत, असे या ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे.

 

 

उपमुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस आयुक्तांना आदेश

देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाकडून या बाबतचं ट्विट करण्यात आलं आहे. बदलापूर येथील दुर्दैवी घटनेची चौकशी करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ IPS अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली SIT गठित करण्याचे आदेश दिले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासाठी, हा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यासाठी आजच प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ठाणे पोलीस आयुक्तांना सुद्धा त्यांनी दिले आहेत, असं या ट्विटमध्ये म्हणण्यात आलं आहे.

नागरिकांचे रेलरोको आंदोलन

बदलापूरमधील नामांकित शाळेत स्वच्छता कर्मचाऱ्याने दोन लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणातील आरोपीला अटक झाली आहे. पॉक्सोची केस या प्रकरणी दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचारानंतर बदलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. रेल्वे रूळावर उतरत नागरिकांनी रेल रोको आंदोलन केला. यावेळी या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आणखी वाचा : 

बदलापूरमध्ये संतप्त जमाव आक्रमक, शाळेची तोडफोड; रेल्वे स्थानकावर दगडफेक