सार

बदलापुरात अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आंदोलक आक्रमक झाले असून त्यांनी संबंधित शाळेची तोडफोड केली आहे. आंदोलकांनी रेल्वे स्थानकावरही दगडफेक केली असून पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा वापर केला आहे.

ठाणे: बदलापूरमध्ये आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी ज्या शाळेत अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाला होता, त्या शाळेती तोडफोड केली आहे. तर दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्थानकावर जमा झालेल्या आंदोलकांनी दगडफेक करत घोषणाबाजी केली आहे.

 

 

पोलिसांनी फोडल्या अश्रूधुराच्या नळकांड्या, जमाव आक्रमक

बदलापुरातील अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आंदोलक आक्रमक झाले आहेत. आंदोलकांकडून सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा करावी, अशी मागणी केली जात आहे. तर दुसरीकडे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. पण जमाव अद्याप पांगलेला नाही.

पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड, शेकडो आंदोलक रस्त्यावर

बदलापूरमध्ये आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत. रेल्वे स्थानक, ज्या शाळेत मुलींवर अत्याचार झाले, त्या शाळेत शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. या शाळेची संपूर्ण तोडफोड करण्यात आली आहे. दुसरीकडे आंदोलकांना पांगवण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड केली जात आहे.

लाडक्या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या मुलीदेखील असुरक्षित, बदलापूर प्रकरणावर उद्धव ठाकरे आक्रमक

मंगळवारी लाडक्या बहिणीच नव्हे तर त्यांच्या छोट्या मुलीदेखील असुरक्षित आहेत. देशात अशा घटना घडता कामा नयेत. आपल्याला दिल्लीतील निर्भया हत्याकांडाचा अनुभव आहे. त्या प्रकरणातील आरोपींवर दोष सिद्ध झाला. पण त्यांना फाशीची शिक्षा द्यायला किती उशीर लागला. अशा घटनेचे राजकारण न करता, अशा प्रकरणांतील आरोपी सुटता कामा नये. सर्व राजकीय नेते आपले पक्ष, जात-पात सोडून एकत्र आले तर महिला सुरक्षित राहतील. असे घडले तरच आपण राज्यातली लाडकी बहीण सुरक्षित आहे, असे आपण म्हणू शकतो.

आणखी वाचा : 

बदलापूर अत्याचारप्रकरणी आतापर्यंत किती जणांना केली अटक, जाणून घ्या