कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत संगणक अभियंता तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. आरोपी हा तरुणीचा जुना मित्र असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

सध्याच्या काळात महाराष्ट्रात बलात्कार आणि विनयभंग गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. कोंढव्यातील उच्चभ्रू सोसायटीत संगणक अभियंता मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपीला शोधण्यासाठी पोलिसांची दहा पथके पाठवण्यात आली आहेत. आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.

आरोपी हा तक्रारदार मुलीचा जुना मित्र 

आरोपीला पोलिसांनी पकडलं असून त्याच्याबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. तो मुलीचा जुना मित्र असून या घटनेनं पुण्यात सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही तरुणी घरी एकटी असताना आरोपीने घरात प्रवेश केला. बुधवारी २ जुलैला सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. पुणे शहरात मुली खरंच सुरक्षित आहेत का हा प्रश्न विचारला जात आहे.

प्रकरण काय आहे? 

पुण्यातील कोंढवा परिसरातील २५ वर्षीय मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानुसार २८ ते ३० वर्ष वयाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलगी ही कल्याणीनगर परिसरात कामाला होती. पीडित मुलगी ही कोंढवा परिसरात २ वर्षांपासून राहत असून घटना घडली त्यादिवशी तिचा भाऊ घराबाहेर गेला होता.

मुलगी एकटी असताना तो मुलगा घरी आला आणि नंतर त्यानं कुरिअर घ्या असं सांगितलं. त्या तरुणीनं कुरिअर माझं नसल्याचं सांगितलं, तरीही त्या मुलानं मुलीला सेफ्टी दरवाजा उघडायला सांगितलं. आरोपी माणसानं मुलीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला, त्यानंतर मुलीवर त्यानं बलात्कार केला. मुलानं मी काढलेले फोटो तुला पाठवतो असं सांगितलं. त्यामुळं मुलगी पूर्णपणे घाबरून गेली आहे.