शेतीच्या वादातून पुतण्याने चुलत बहिण आणि चुलत भावाची हत्या केली आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. वर्धा जिल्ह्यातील निमसडा गावात ही घटना घडली.

शेतीच्या वादातून भांडण होण्याचं प्रमाण वाढलं आहे. लहान भाऊ आणि मोठा भाऊ हातभर जमिनीसाठी आयुष्यभर भांडत राहतात आणि आपुलकीचे संबंध खराब होऊन जातात. शेतीच्या हिस्सेवाटणीच्या कारणातून पुतण्याने माय लेकाची हत्या केली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये ही घटना घडली असून आरोपीने विष पिऊन आत्महत्या केली आहे.

शेतात तिघांमध्ये झाला वाद - 

साधना सुभाष मोहिजे आणि नितीन सुभाष मोहिजे अशी मृत झालेल्या लोकांची नाव आहेत. पुतण्या महेंद्र भाऊराव मोहिजे असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. मृत साधना आणि त्यांचा पुतण्या महेंद्र यांच्यात शेतीचा वाद होता. याच वादातून २८ रोजी सकाळी तिघांमध्ये वाद झाला आहे. महेंद्रने साधना आणि त्यांचा मुलगा नितीन यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले होते. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

पोलीस तात्काळ झाले उपस्थित 

पोलीस घटनास्थळी तात्काळ आले होते. निमसडा गावात घटनास्थळी दाखल झाले आहेत. अल्लीपूर पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक निमसडा गावात दाखल झाले आहेत. आरोपीने आत्महत्या केली असून त्याने आधी चुलतीला आणि चुलत भावाला मारून टाकले. आरोपीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून या घटनेमुळे वर्धा जिल्ह्यात हादरा बसला आहे.