50 खोके एकदम ओके, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठवलेल्या नोटीसला दिले प्रत्युत्तर

| Published : May 29 2024, 04:45 PM IST / Updated: May 29 2024, 04:47 PM IST

Sanjay Raut
50 खोके एकदम ओके, खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पाठवलेल्या नोटीसला दिले प्रत्युत्तर
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या घडीला वेगवेगळ्या गोष्टी घडत असून त्यामुळे सगळं राजकारण ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केल्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांच्या वकिलाकडून लीगल नोटीस पाठवण्यात आली आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या घडीला वेगवेगळ्या गोष्टी घडत आहेत. अजून लोकसभा निवडणुकीचा निकाल लागायचा बाकी असताना सत्ताधारी आणि विरोधी असे दोनही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप लावताना दिसून येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना नोटीस पाठवून दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वकिलाकडून संजय राऊत यांना मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. 

संजय राऊतांनी केला पलटवार? - 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वकिलाकडून आलेल्या नोटीसचा फोटो संजय राऊत यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर टाकला आहे. त्यांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, "50 खोके एकदम ओके l इसे कहते है ऊलटा चोर कोतवाल को डाटे। गैरसंविधानिक मुख्यमंत्री श्रीमान शिंदे ने हमे एक legal notice भेजी है.very intresting and one of the funny political document.अब आयेगा मजा!! जय महाराष्ट्र! त्यांच्या या ट्विटमुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. 

संजय राऊत यांनी सामना वृत्तपत्रातून केली होती टीका - 
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामना या वृत्तपत्रातून रविवारी रोखठोक भूमिका मांडली होती. त्यांनी महायुतीमध्ये काहीही आलबेल नसल्याचे म्हणताना अजित पवार गटाचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी एकनाथ शिंदे गटाने काम केले असल्याचा त्यांच्यावर आरोप केला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय कडवी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी बोलताना म्हटले की, गांजा पिऊन लेख लिहिणाऱ्यांवर मी बोलणार नाही.