सार

ईव्हीएम हॅक करतो असे म्हणत ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाला छत्रपती संभाजीनगरमधून एकाला अटक केली आहे.

 

छत्रपती संभाजीनगरमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदान दि. 13 रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर काल तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असतानाच छत्रपती संभाजीनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. ईव्हीएम हॅक करतो असे म्हणत ठाकरे गटाचे नेते व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे अडीच कोटी रुपयांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकाला छत्रपती संभाजीनगरमधून एकाला अटक करण्यात आली आहे.अंबादास दानवे यांच्या भावाने सापळा रचत हा प्रकार उघडकीस आणला आहे. मारुती ढाकणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.पोलिसांनी आरोपीला एक लाख रुपये घेताना रंगेहात पकडले..

पोलीस आयुक्तांचे काय म्हणणे :

पोलीस आयुक्त मनोज लोहिया सांगितले की, पैसे मागणाऱ्या आरोपीचे नाव मारोती ढाकणे असे आहे. तो मुळचा नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातला रहिवासी असून ढाकणे सैन्य दलामध्ये जवान आहे. सध्या त्याचे पोस्टिंग जम्मू काश्मिरमध्ये आहे.अधिक माहिती अशी की, त्याच्यावर मोठं कर्ज आहे. ते कर्ज फेडण्याच्या विचारातून ढाकणेने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याशी संपर्क साधून ईव्हिएम हॅक करण्याचे तंत्र मला अवगत असल्याचे सांगितले. त्यासाठी त्याने दानवे यांच्याकडे अडीच कोटींची मागणी केली. दानवे यांना संशय आल्याने त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेची संपर्क साधला. दानवे यांचे बंधू राजेंद्र दानवे यांनी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दिली. त्यानुसार त्याला संपला रचून पडकण्यात आले.

याविषयी अधिक माहिती :

मारुती ढाकणे अहमदनगर जिल्ह्यातील रहिवाशी असून तो लष्करी जवान असून सध्या सुटीवर आला आहे. मागील ५ ते ६ महिन्यांपासून तो अंबादास दानवे यांना सातत्याने फोन करून मी इलेक्शन मॅनेजमेंट करतो, मला काम द्या अशी गळ घालत होता. दानवे यांनी नेमके कोणते काम करतो असे विचारले असता, 'अडीच कोटी रुपये द्या, मी ईव्हीएम मशीन हॅक करून तुम्हाला पाहिजे तसा निकाल लावून देतो' असे सांगितले.

आणखी वाचा :

लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा गट काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

धाराशिवमध्ये मतदानाला गालबोट, शिवसेना गटाच्या कार्यकर्त्यावर चाकू हल्ला केल्याने मृत्यू