छत्रपती संभाजीनगरमध्ये एक भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून दोनजण गंभीर जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

Chhatrapati Sambhajinagar Accident : छत्रपती संभाजीनगरमध्ये मंगळवारी (२४ जून) मध्यरात्रीच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. पाच मित्र जेवणासाठी कारने धाब्यावर गेले होते, मात्र परतीच्या वाटेवर त्यांच्या गाडीचा गंभीर अपघात झाला. या अपघातात तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नाना घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भरधाव वेगात कार डिव्हायडरला धडकली

ही घटना शहरातील सिल्लोड रोडवरील बिल्डा फाटा परिसरात रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. फुलंब्री येथील धाब्यावर जेवण करून परत येताना, गाडीचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. परिणामी कार थेट पुलावरील दुभाजकाला जाऊन धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की कारमधील तीन तरुण जागीच ठार झाले, तर दोन तरुण गंभीर जखमी झाले.

अपघातात मृत्यू झालेल्यांचे वय अवघे 15 ते 18 वर्ष

या अपघातातील सर्व तरुणांचे वय केवळ १५ ते १८ वर्षांच्या दरम्यान असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त कारमधील सर्व तरुण एकमेकांचे मित्र होते. रात्र वाढल्यामुळे रस्त्यावर फारशी वाहतूक नव्हती, त्यामुळे भरधाव वेगाने गाडी चालवली जात होती. परंतु, अचानक गाडीचा तोल जाऊन कार डिव्हायडरवर आदळली आणि हा भीषण अपघात घडला.

पोलिसांकडून अधिक तपास सुरू

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. अपघाताचं कारण चालकाकडून नियंत्रण सुटणं हे प्राथमिक तपासात स्पष्ट झालं असून, अधिक तपास पोलीस करीत आहेत.

कार आणि बसची धडक, 12 जण जखमी

गेल्या काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगरमधअये कारसह बसचा भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली होती. सदर घटना निपाणी फाट्याजवळ घडल्याचे सांगण्यात आले. लातूरच्या दिशेने एसटी बस जात असताना हा अपघात झाला. या अपघातात 12 जण जखमी झाले.

(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.

आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.