सार

Nanded special trains to Pandharpur : आषाढी एकादशीसाठी नांदेडमधील तीन स्थानकांवरून विशेष गाड्या पंढरपूरला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांची सोय होणार असून दोन दिवस या गाड्या सोडल्या जाणार आहेत.

Nanded special trains to Pandharpur : आषाढी एकादशी अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपली असताना पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. आषाढी एकादशीसाठी आता नांदेडहून पंढरपुरला विशेष गाड्या धावणार असून 16 व 17 जुलै रोजी या अतिरिक्त रेल्वे पंढरपूरसाठी देण्यात आल्या आहेत. दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयाने याबाबत पत्रक काढले असून आता या विभागातून पंढरपूरसाठी जाणाऱ्या भाविकांची सोय होणार आहे.

नांदेड विभागातून 6 विशेष गाड्या पंढरपूरला

नांदेड रेल्वे विभागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सणासुदीच्या काळात अतिरिक्त प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आषाढी एकादशीसाठी 6 विशेष गाड्या पंढरपूरला धावणार असल्याचे सांगण्यात आले.

राज्यभर मोठ्या उत्साहाने आणि तल्लीनतेने साजरा करण्यात येणाऱ्या आषाढी एकादशीला राज्यभरातून मोठ्या संख्येने लोक पंढरपूरला जातात. मंदिराजवळील मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी यात्रेकरू प्रवासी पंढरीचा सेवेसाठी रवाना होतात. त्यांच्या प्रवास सोयीसाठी नांदेड विभागातील तीन महत्त्वाच्या स्थानकांवरून विशेष गाड्या सोडणार असल्याचे सांगण्यात आले.

कोणत्या स्थानकांवरून धावणार विशेष गाड्या?

नांदेड विभागातील तीन महत्त्वाच्या स्थानकांवरून म्हणजेच नगरसोल अकोला आणि आदीलाबाद येथून पंढरपूरसाठी या गाड्या सोडण्यात येणार आहेत. या विशेष गाड्यांमध्ये 2 स्लीपर क्लास आणि 14 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत.

कार्तिकी एकादशीच्या आधीच्या दिवशी म्हणजेच 16 जुलै व 17 जुलै हे दोन दिवस नांदेड विभागातील या तीन स्थानकावरून विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.

जाणून घ्या रेल्वेचे तपशील

गाडी क्रमांक  मार्ग           निघण्याची तारीख व वेळ       पोहोचण्याची तारीख व वेळ

07515  नगरसोल-पंढरपूर     16.07.2024 (मंगळ) 19.00     17.07.2024 (बुध) 11.30

07516   पंढरपूर-नगरसोल    17.07.2024 (बुध) 23.55         18.07.2024 (गुरु) 20.00

07505   अकोला-पंढरपूर      16.07.2024 (मंगळ) 11.00     17.07.2024 (बुध) 10.50

07506   पंढरपूर-अकोला      17.07.2024 (बुध) 21.40         18.07.2024 (गुरु) 20.00

07501  आदिलाबाद-पंढरपूर 16.07.2024 (मंगळ) 09.00      17.07.2024 (बुध) 03.00

07504  पंढरपूर-आदिलाबाद 17.07.2024 (बुध) 20.00         18.07.2024 (गुरु) 15.00

 

कोणत्या मार्गे जाणार या विशेष रेल्वे?

1. गाडी क्रमांक 07515/07516 नगरसोल -पंढरपूर- नगरसोल विशेष गाडी

या विशेष गाड्या रोटेगाव, लासुर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्सी टाऊन आणि कुर्डूवाडी स्थानकांवर दोन्ही दिशेला थांबतील.

या विशेष गाड्यांमध्ये 04 स्लीपर क्लास आणि 14 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत.

2. गाडी क्रमांक 07505/07506 अकोला-पंढरपूर-अकोला विशेष गाडी

ही विशेष गाडी दोन्ही दिशेला वाशिम, हिंगोली, बसमत, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, जाहिराबाद, विकाराबाद, तांदूर, सेरम, चित्तपुर, वाडी, कलबुरगी, सोलापूर, कुरडूवाडी रेल्वे स्थानकावर थांबेल.

या विशेष गाड्यांमध्ये 01 वातानुकूलित, 04, स्लीपर क्लास आणि 17 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे आहेत

3. गाडी क्रमांक 07501/07502 आदिलाबाद-पंढरपूर-आदिलाबाद विशेष ट्रेन

या विशेष गाड्या किनवट, बोधडी, धानोरा, सहस्रकुंड, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा जंक्शन, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बारसी टाऊन, कुरडुवडी जंक्शन येथे दोन्ही दिशांना थांबेल.

आणखी वाचा : 

Ashadhi Wari 2024 : आषाढीला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी बुंदीचे 11 लाख लाडू बनवण्यास सुरूवात, गरज पडल्यास आणखी 5 लाख लाडू बनवणार