मराठी शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीकरणाच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबईत मोर्चा काढणार असताना, गायिका आशा भोसले यांनी ठाकरे बंधूंबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे.
मराठी शाळांमध्ये हिंदी भाषा सक्तीकरण करण्याच्या विरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मुंबईमध्ये मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाबद्दलचा सस्पेन्स वाढताना दिसत आहे. वरून सरदेसाई आणि संदीप देशपांडे या दोघांनी एकमेकांची भेट घेतली आणि मोर्चा बाबतचा आढावा घेतला. अशातच गायिका आशा भोसले यांनी ठाकरे बंधूंच्या संदर्भात केलेल्या एका वक्तव्याची सोशल मीडियावर सध्या जोरात चर्चा सुरू आहे.
मी फक्त आशिष शेलार यांना ओळखते
आशा भोसले या आर डी बर्मन यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी आल्या होत्या, यावेळी त्यांच्यासोबत मंत्री आशिष शेलार उपस्थित होते. त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला, यावेळी बोलताना त्यांनी मी फक्त आशिष शेलार यांनाच ओळखत असून इतर राजकारण्यांना मी ओळखत नाही असे उत्तर दिलं.
सोशल मीडियावर चर्चांना उधाण
ठाकरे बंधू एकत्र येणार का यावर प्रश्न विचारला असता त्यांनी मी फक्त आशिष शेलार यांनाच ओळखत असल्याचे सांगितलं. आशा भोसले आणि ठाकरे कुटुंब यांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत सोशल मीडियावर आशा भोसले यांचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या रोजचे फोटो व्हायरल झालेत. पण आता त्यांनी अशा प्रकारे केलेल्या विधानामुळे सोशल मीडियावर युजरने वेगवेगळे अर्थ काढायला सुरुवात केलीय.
