सार

अमरावती येथे एका चालकाच्या हुशारीमुळे मिनी बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. खरंतर, बसवर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात चालकाच्या हाताला गोळी लागली.

Crime News : अमरावती येथे एका मिनी बस चालकाच्या हुशारीमुळे काही प्रवाशांचा जीव वाचला आहे. खरंतर, बसवर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता. मिनी बस अमरावती (Amravati) येथून नागपूरच्या (Nagpur) दिशेने जात असताना गोळीबार करण्यात आल्याचे सांगितले जात आहेत. या गोळीबारात बस चालकाच्या हाताला देखील गोळी लागली गेली.

प्रवाशांचा जीव वाचवण्यासाठी चालवली बस
अज्ञात हल्लेखोरांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात चालकाच्या हाताला गोळी लागली. तरीही चालकाने बस न थांबवता जखमी अवस्थेत 30 किलोमीटर गाडी घेऊन जात थेट पोलीस स्थानकाजवळ ती थांबवली. या घटनेत तीन जण जखमी झाले आहेत.

नक्की काय घडले?
अमरावतीत रात्री 2 वाजताच्या सुमारास नागपुरच्या दिशेने जाणाऱ्या कारमधून अज्ञात हल्लेखोरांनी मिनी बसवर गोळीबार केला. या गोळीबारात बस चालकाच्या हाताला गोळी लागली तरीही त्याने बस थांबवली नाही. यानंतर बस थेट तिवसा पोलीस स्थानकात जाऊन उभी केली. दरम्यान, महामार्गावर मिनी बसचा दूरवर पाठलाग केल्यानंतर अज्ञात हल्लेखोरांनी पळ काढला.

मिनी बसचा पाठलाग करत होते हल्लेखोर
घटनेबद्दल माहिती देत चालक खोमदेव कवाडे यांनी म्हटले की, "बसने टोल नाका पार केल्यानंतर सातत्याने एक कार आमचा पाठलाग करत होती. या कारमध्ये अज्ञात हल्लेखोर असल्याचा संशय आल्याने बसचा वेग वाढवला. यानंतर कारमधील हल्लेखोरांनी धमकी देत बस थांबवण्यास सांगितली. पण बस न थांबवल्याने हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. या गोळीबारात हाताला गोळी लागूनही प्रवशांचा जीव वाचवण्यासाठी बसचा वेग वाढवत थेट ती पोलीस स्थानकात उभी केली." पोलिसांनी खोमदेव यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

या प्रकरणात अधिक तपास केला असता कळले की, अज्ञात हल्लेखोरांनी याआधी देखील असाच प्रकार केला होता. एका ट्रक चालकाला अज्ञात ठिकाणी थांबवत त्याला झाडाला बांधून त्याच्याकडील दहा हजारांची रोख रक्कम आणि मोबाईल चोरला होता.

आणखी वाचा : 

काळी जादू करत असल्याचा संशयामुळे 75 वर्षीय वृद्धाला जळत्या निखाऱ्यावर चालवले, पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : पुणे येथील रस्त्यांवर स्क्रू फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, नागरिकांनी दिल्या संतप्त प्रतिक्रिया

धक्कादायक ! मंत्रालयातून जारी केल्या जाणाऱ्या शासकीय कागदपत्रांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी आणि शिक्के, पोलिसात तक्रार दाखल