सार
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा आज महाराष्ट्रात विस्तार होणार आहे. शपथविधी सोहळा नागपुरात दुपारी ४ वाजता होणार असून त्यात ३९ आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ताब्यात असलेले गृह खाते भाजपकडे राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्यातील निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपने गृह, महसूल, पाटबंधारे आणि शिक्षण ही खाती स्वत:कडे ठेवल्याची सुत्रांची माहिती असून या मंत्रिपदांची जबाबदारी कोणाकडे राहणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मंत्रिमंडळच्या शपथविधी सोहळ्यासाठी नागपूरची निवड करण्यात आली असून, तेथेच तयारी सुरू आहे. भाजपचे २० आमदार मंत्री होणार असल्याचं बोललं जात आहे पण पक्ष काही मंत्रीपदं रिक्त ठेवू शकतो. याशिवाय शिवसेनेच्या कोट्यातील १३ आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील १० आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी-शिवसेनेला काय मिळणार?
नगरविकास, गृहनिर्माण, उद्योग, आरोग्य, वाहतूक, पर्यटन, आयटी, मराठी भाषा आणि एमएसआरडीसी या खात्यांची जबाबदारी शिवसेनेकडे असेल, असे सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर अर्थ, सहकार आणि क्रीडा ही खाती राष्ट्रवादीला मिळू शकते. मात्र, या दोन्ही पक्षांकडून या मंत्रिपदाची जबाबदारी कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याशिवाय गृह, महसूल, वीज, उच्च व तंत्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण आणि सिंचनाची जबाबदारी भाजपने स्वतःकडे ठेवल्याचे सांगण्यात येत आहे.
हे आमदार भाजपच्या कोट्यातून शपथ घेण्याची शक्यता
१. नितेश राणे
२. पंकजा मुंडे
३. गिरीश महाजन
४. शिवेंद्रराजे
५. देवेन्द्र भुयार
६. मेघना बोर्डीकर
७. जयकुमार रावल
८. मंगलप्रभात लोढा
हे आमदार शिवसेनेच्या कोट्यातून शपथ घेण्याची शक्यता
१. उदय सामंत (कोकण)
२. शंभुराज देसाई (पश्चिम महाराष्ट्र)
३. गुलाबराव पाटील (उत्तर महाराष्)ट्र
४. दादा भुसे (उत्तर महाराष्ट्र)
५. संजय राठोड (विदर्भ)
६. संजय शिरसाट (मराठवाडा)
७. भरतशेठ गोगावले (रायगड)
८. प्रकाश आबिटकर (पश्चिम महाराष्ट्र)
९. योगेश कदम (कोकण)
१०. आशिष जैस्वाल (विदर्भ)
११. प्रताप सरनाईक( ठाणे)
हे आमदार राष्ट्रवादीच्या कोट्यातून घेण्याची शक्यता
१. आदिती तटकरे
२. बाबासाहेब पाटील
३. दत्तमामा भरणे
४. हसन मुश्रीफ
५. नरहरी झिरवाळ
आणखी वाचा-
फडणवीस मंत्रिमंडळात मंत्री होणाऱ्या नेत्यांची लिस्ट: पंकजा, नितेश राणेंचा समावेश