सार

अजित पवारांनी खुले पत्र लिहून आपण भाजप आणि शिवसेना पक्षासोबत हातमिळवणी का केली याबद्दलचे स्पष्टीकरण दिले आहे. याशिवाय अजित पवारांनी म्हटले की, "माझी काम करण्याची पद्धत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखी आहे."

Ajit Pawar Tweet : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी रविवारी (25 फेब्रुवारी) आपल्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म ‘X’ वर एक खुले पत्र जारी केले आहे. या पत्रात भाजप (BJP) आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत (Eknath Shinde Shiv Sena) का हातमिळवणी केली याबद्दलची आपली भुमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार यांनी म्हटले की, "मी एक विचारधारा आणि उद्देशासह कोणतीही तडजोड न करता विकासकामे पूर्ण करण्याच्या उद्देशाने आपली भुमिका बजावली आहे."

अजित पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचे कौतुकही केले आहे. अजित पवारांनी म्हटले की, “मला दिसतेय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वामध्ये महत्वपूर्ण विकासकामे पार पडत आहेत. मला त्यांचे नेतृत्व आणि योग्य निर्णय घेण्याची प्रक्रियेसंदर्भासह अन्य गुण मला आवडले. माझे आणि त्यांचे कार्य समान आहे. मोठ्यांचा अनादर करण्याचा माझा काही उद्देश नाही.”

याशिवाय अजित पवारांनी म्हटले की, “राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याविषयीची माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं केलेला हा पत्रप्रपंच...”

अजित पवारांचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस
जुलै 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठ आमदारांसह अजित पवारांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले. या राजकरणाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या गटाने सभापतींना पक्ष तोडणाऱ्या आमदारांना अयोग्य घोषित करण्याची मागणी केली होती. विधानसभेचे सभापती राहुल नार्वेकर यांनी आमदारांच्या अयोग्येसंदर्भात 15 फेब्रुवारीला निर्णय देत अजित पवारांचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय दिला होता. यामुळे शरद पवारांकडून घड्याळ आणि पक्षाचे नावही गेले.

शरद पवारांच्या गटाला मिळाले नवे पक्षनाव आणि पक्षचिन्ह 
6 फेब्रुवारीला निवडणूक आयोगाने (Election Commission) शरद पवारांच्या गटाला झटका देत अजित पवारांचीच खरी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयावर शरद पवारांच्या गटाकडून निवडणूक आयोगावर जोरदार टीका करण्यात आली होती. यानंतर शरद पवारांना आपल्या पक्षासाठी नवे पक्षनाव आणि पक्ष चिन्ह निवडायचे होते.

याआधी नव्या पक्षनावासाठी शरद पवार यांनी आपल्या गटासाठी तीन नावे दिली होती- 'शरद पवार काँग्रेस', 'एमआय राष्ट्रवादी', 'शरद स्वाभिमानी'. याशिवाय पक्षचिन्ह म्हणून 'चहाचा कप', 'सूर्यफूल' आणि 'उगवता सूर्य' असे पर्याय दिले होते. अशातच निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार' असे नाव दिले.

आणखी वाचा :

Maratha Reservation : "मराठा समाजाला आरक्षण दिलेय, आता आंदोलन करण्याचा हट्ट थांबवावा", देवेंद्र फडवणीस यांचे मनोज जरांगेंना आवाहन

Rajya Sabha Election 2024 : शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांना राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर

छत्रपती शिवाजी महाराजांचे मुंबईतील पहिले मंदिर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन