अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन असुरक्षित? माजी आमदार निलेश लंके यांच्या ट्विटने उडाली खळबळ

| Published : May 22 2024, 09:21 AM IST / Updated: May 22 2024, 09:22 AM IST

ahmednagar south strong room pic
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन असुरक्षित? माजी आमदार निलेश लंके यांच्या ट्विटने उडाली खळबळ
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील ईव्हीएम मशीन असुरक्षित आहेत का, असा प्रश्न माजी आमदार निलेश लंके यांना पडला असून त्यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. 

सध्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान चालू असून ठिकठिकाणी मतदारांनी मतदानासाठी गर्दी केलेली दिसून येते. काही ठिकाणी ईव्हीएममध्ये अडचण आल्याचे सांगण्यात येत आहे. अनेक राजकारणी व्यक्तींनी याबद्दल सोशल मीडियामधून सांगितले आहे. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून माजी आमदार निलेश लंके यांनी ट्विट केले आहे. 

अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या ईव्हीएम मशीनमध्ये घातला घोटाळा - 
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील लढत रंजक होती. येथे भाजपकडून सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाकडून निलेश लंके यांना तिकीट देण्यात आले होते. सुजय विखे हे मागील टर्मला येथून विद्यमान खासदार होते तर निलेश लंके हे पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. या लढतीनंतर मतदान यंत्राजवळ छेडछाड करण्यात आल्याचा दावा निलेश लंके यांनी केला आहे. I

निलेश लंके यांनी काय केले ट्विट - 
माजी आमदार निलेश लंके यांनी ट्विट केले असून त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, “संरक्षणव्यवस्था थोडे उठा माणूस गोदामा पर्यंत आलाय. काल रात्री आमच्या नगर दक्षिण अहिल्यानगर मतदारसंघाच्या ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने प्रवेश करत चक्क शटरपर्यंत जात सीसीटीव्ही मध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला माझ्या सहकार्याने तो लगेच हाणून पाडला. माझे सहकारी हा इसम पकडू शकतात मग कोणतीही पूर्व सूचना न देताना गेलेल्या त्या व्यक्तीला त्रिस्तरीय सुरक्षा का रोखू शकली नाही? कुंपणच आता शेत खातय.. लोकशाही चोरी करण्याचा प्रयत्न केला जातोय पण प्रशासन मात्र उघड्या डोळ्यांनी पाहतय.”
आणखी वाचा - 
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा राजकीय वारस कोण?, स्वत:च केलं जाहीर; म्हणाले...
सरकारी कर्मचारी अडचणीत, 5 वर्षात 630 सुट्या, वर्षात फक्त 240 दिवस काम