विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची करण्यात आली बदली

| Published : Aug 07 2024, 11:09 AM IST

Maharashtra Police Constable Result 2023
विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांची करण्यात आली बदली
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. नवी मुंबईच्या पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि मुंबईच्या लोहमार्ग पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांची बदली झाली आहे.

राज्यात येत्या दोन ते तीन महिन्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीपूर्वी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या राज्य सरकारने केल्या आहेत. राज्य पोलीस सेवेतील पोलीस उपयुक्त दर्जाच्या १६ अधिकाऱ्यांचे आदेश दिले आहेत. नवी मुंबईचे पोलीस उपयुक्त विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त लोहमार्ग मुंबईचे दत्ता नलावडे यांची बदली झाली आहे. 

कोणाची कोठून कुठे बदली (कंसात नवीन ठिकाण) - 

  • संदीप पालवे, पोलीस अधीक्षक- एटीएस, छत्रपती संभाजीनगर (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड)
  • संदीप भाजीभाकरे, पोलीस उपायुक्त-लोहमार्ग, मुंबई (राज्य गुप्तवार्ता विभाग, नागपूर)
  • सचिन गुंजाळ, पोलीस उपायुक्त ठाणे शहर (एटीएस, छत्रपती संभाजीनगर)
  • दत्ताराम राठोड, पोलीस अधीक्षक नागरी हक्क संरक्षण, अमरावती (अतिरिक्त अधीक्षक, लोहमार्ग नागपूर)
  • विवेक पानसरे, पोलीस उपायुक्त नवी मुंबई (मुंबई)
  • रश्मी नांदेडकर, पोलीस उपायुक्त- राज्य गुप्तवार्ता विभाग (नवी मुंबई)
  • प्रदीप चव्हाण, मुख्य सुरक्षा अधिकारी- सचिवालय मुंबई (पोलीस उपायुक्त मुंबई)
  • मीना मकवाना, पोलीस उपायुक्त- राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर (ठाणे शहर)
  • दत्ता नलावडे, पोलीस उपायुक्त मुंबई (लोहमार्ग, मुंबई)
  • राजू भुजबळ, पोलीस उपायुक्त मुंबई (मुख्य सुरक्षा अधिकारी, सचिवालय, मुंबई)
  • रूपाली दरेकर, पोलीस अधीक्षक – नागरी हक्क संरक्षण, छत्रपती संभाजीनगर (महामार्ग सुरक्षा पथक, छत्रपती संभाजीनगर)
  • अनिता जमादार, पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, छत्रपती संभाजीनगर (नागरी हक्क संरक्षण, छत्रपती संभाजीनगर),
  • लता फड, पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक पुणे (पोलीस उपायुक्त- राज्य गुप्तवार्ता विभाग, छत्रपती संभाजीनगर).
    आणखी वाचा - 
    एआयमुळे डेलमधील कर्मचाऱ्यांचे जाणार जॉब, नोकऱ्यांचे भविष्य येणार धोक्यात
    Bangladesh Crisis Live: खालिदा झिया यांचा मुलगा लंडनहून मायदेशी का आला?