छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव परिसरात एका महिला कीर्तनकाराचा मृतदेह आढळला आहे. दगडाने ठेचून हत्या केल्याचे समोर आले असून, पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सध्याच्या काळात खून, अपहरण याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव परिसरात एका महिला कीर्तनकाराचा मृतदेह आढळला. या कीर्तनकाराची हत्या दगडाने ठेचून केली असून या गुन्ह्यात एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

आश्रमात घुसून केली हत्या 

पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली असून आरोपीला अटक केल्यानंतर पुढील गोष्टी स्पष्ट होणार आहेत. महाराज ह.भ.प. संगीताताई पवार असं हत्या झालेल्या कीर्तनकाराचे नाव आहे. आश्रमात घुसून कीर्तनकाराची हत्या करण्यात आली असून यामुळे आजूबाजूला एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच घटना घडलेल्या ठिकाणी आजूबाजूच्या गावातील लोकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

हत्या कोणी केली? 

हत्या कोणी केली हा प्रश्न सर्वांनाच पडला असून पोलीस या गुन्ह्यामागे कोण आहे याचा कसोशीने तपास करत आहेत. लवकरच कीर्तनकाराची खून करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात येईल असं सांगण्यात आलं आहे. वैजापूर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली असून या खुनामागील सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.