सार

दहावीच्या निकालात १०० टक्के गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. लातूर विभागातील विद्यार्थ्यांना सर्वात जास्त टक्के मिळाले असून त्यांची संख्या १२३ आहे. लातूर पॅटर्नमध्ये धाराशिव, नांदेड आणि लातूर या तीन जिल्ह्यांचा समावेश होतो. 

माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही लातूर पॅटर्नची हवा राहिली असून येथील सर्वात जास्त विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी टक्के पडले आहेत. राज्यातील १८३ विद्यार्थ्यांना १०० टक्के गुण मिळाले असून त्यापैकी १२३ विद्यार्थी हे लातूर बोर्डातील आहेत. 

लातूर पॅटर्नचा दबदबा कायम - 
लातूर पॅटर्नचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी चांगला दबदबा राहिला असून या विभागामध्ये लातूर, नांदेड आणि धाराशिव या जिल्ह्यांचा समावेश होतो. या विभागातून दहावीच्या परीक्षेला बसलेल्या परीक्षार्थींची संख्या ही १ लाख ५ हजार ७८९ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ४ हजार ५०३ विद्यार्थी परीक्षेस बसले असून ९९ हजार ५७० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. लातूर जिल्ह्याचा ९६.४६%, धाराशिव ९५.८८% आणि दहावीचा निकाल ९३.९९ टक्के लागला आहे. 

शंभर टक्के मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वाढले प्रमाण - 
२०२३ मध्ये राज्यात १५१ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण घेतले होते. यामध्ये १०८ विद्यार्थी हे लातूर बोर्डाचे होते. यंदाही राज्यात १८३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळवले आहेत. लातूर विभागातील १२३ विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश असून यंदाही लातूर पॅटर्नचा दबदबा आहे. दहावीच्या निकालात विभागीय निकालात अव्वल स्थान मिळवले आहे. लातूर पॅटर्नचा दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दबदबा राहिला आहे. 
आणखी वाचा - 
SSC 10th Result 2024: राज्यात दहावीचा निकाल 95.81%, दहावीप्रमाणेच बारावीतही कोकण विभाग अव्वल
मुंबईत पावसाची शक्यता, मराठवाड्यातही विजांच्या कडकडाटासह बरसणार