10:46 PM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates Thane School Closed - उद्या ७ जुलैला ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजला सुट्टी जाहीर

Heavy Rain in Thane school Closed : ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळा, कॉलेजला उद्या ७ जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यानंतर प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.

Read Full Story
09:43 PM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates Satara Rain - महाबळेश्वरमध्ये तुफान पाऊस, नदीवरील पूल खचला; शेकडो पर्यटक अडकले

Mahabaleshwar Heavy Rainfall : महाबळेश्वरमध्ये नदीवरील एक पूल खचल्याची घटना समोर आली आहे. पूल खचल्यानंतर तिथे अडकलेल्या पर्यटकांना आणि वाहनांना क्रेनच्या मदतीने सुरक्षित रेस्क्यू करण्यात आलं.

Read Full Story
07:33 PM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates CM Devendra Fadnavis - कर्मचाऱ्यांना Work From Home द्या, मुसळधार पावसात मुख्यमंत्र्यांच्या सूचना

Mumbai Rain Work From Home : राज्यभरात मुसळधार पावसाने अनेक भाग जलमय झाले आहेत. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी खासगी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याचं आवाहन केलं आहे.

Read Full Story
06:12 PM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates Pune Rain - पावसाचा अलर्ट, वारकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची सूचना

Pune Rain Ashadi Wari Alandi : पुण्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. अशात आळंदीमध्ये ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना महत्त्वाचं आवाहन करण्यात आलं आहे.

Read Full Story
04:54 PM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates Nashik Rain - नाशिक, त्र्यंबकेश्वर भागात ढगफुटीची शक्यता, मुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Cloudburst News : नाशिकमध्ये ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या अंदाजानंतर शहरात शाळा-कॉलेजला सुट्टी देण्यात आली. तर सप्तश्रृंगी आणि त्र्यंबकेश्वर मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे.

Read Full Story
03:04 PM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates विमानाने प्रवास करण्यापूर्वी वेळापत्रक पाहा, इंडिगो कंपनीकडून प्रवाशांना सूचना

मुंबई-पुण्यात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका विमान सेवेलाही झाला आहे. यामुळे इंडिगो कंपनीकडून विमानाने प्रवास करण्यापूर्वी वेबसाइटवर वेळापत्रक पाहा असे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे.

02:14 PM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates Maharashtra Rain - येत्या ८ जुलैपर्यंत हवामान खात्याकडून अलर्ट, नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

राज्यात ठिकठिकाणी अतिमुसळधार पाऊस कोसळत आहे. अशातच येत्या 8 जुलैपर्यंत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. याशिवाय नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. 

Read Full Story
01:34 PM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates मुंबई-गोवा महामार्गावर 8 ठिकणी दरड कोसळल्याची दुर्घटना

मुंबई-गोवा महामार्गावर 8 ठिकणी दरड कोसळल्याची दुर्घटना घडल्या आहेत. यामुळे नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा असे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले आहे. 

12:48 PM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates मुंबईकडे जाणारा एक्स्प्रेसवे बंद, दरड-पाणी साचल्याचा फटका

मुंबईकडे जाणारा एक्स्प्रेसवे बंद झाला आहे. याशिवाय दरड कोसळली गेली आहे. घटनास्थळी दरड बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू आहे. याशिवाय मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

YouTube video player

12:40 PM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates मुख्यमंत्र्यांकडून आपत्ती व्यवस्थापन विभागात आढावा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपत्ती व्यवस्थापन विभागात आढावा घेण्यात आला आहे. 

12:33 PM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates मुंबईत मुसळधार पाऊस, हवामान खात्याकडून रेड अलर्ट

मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

11:19 AM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे वाहतूकीसाठी बंद

मुसळधार पावसामुळे अंधेरी सबवे वाहतूकीसाठी बंद करण्यात आला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे. 

10:44 AM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates दादरच्या सानेगुरूजी विद्यालयाजवळ झाडं कोसळल

दादरच्या सानेगुरूजी विद्यालयाजवळ झाडं कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. यामुळे एका वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. याशिवाय मरिन ड्राइव्हवरील देखील झाडं कोसळल्याची घटना घडली आहे. 

10:23 AM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुरग्रस्त परिस्थितीचा आढावा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पुरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. 

10:15 AM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates मुंबई-गोवा महामार्गावर 5 तास वाहतूक ठप्प

मुंबई-गोवा महामार्गावर 5 तास वाहतूक ठप्प झाली आहे. सध्या पाण्यातून वाहने काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. 

10:01 AM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates उरसे टोलनाका परिसात दरड कोसळली

उरसे टोलनाका परिसात दरड कोसळली गेली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे. 

10:00 AM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याच्या प्रकारावर हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्विट

मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याच्या प्रकारावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ट्विट केले आहे. 

Scroll to load tweet…

08:56 AM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates पाटणमधील घरावर दरड कोसळली

मावळ तालुक्यातील पाटण येथील एका दुर्गम गावात दरड कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. एका घरावर दरड कोसळून संपूर्ण कुटुंब त्या खाली अडकल्याची भीती आहे. घटनास्थळी बचाव कार्य वेगाने सुरू करण्यात आले आहे.

08:45 AM (IST) Jul 06

Mumbai-Pune Live Updates मिसिंग लिंकवर दरड कोसळली

मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सध्या या ठिकाणी दरड बाजूला करण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे मुंबई-पुणे अशा दोन्ही दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांनी पुढील सुचनेपर्यंत या मार्गावर प्रवास करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.