Belly Fat : पोटावरील चरबी घटवण्यासाठी घरच्या घरी करा हे व्यायाम
- FB
- TW
- Linkdin
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी व्यायाम
Fat Loss Exercises: आजकालची बिघडलेली लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे बहुतांशजणांना लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे विविध आजार मागे लागतात. शिवाय थंडीत शरीराची हालचाल अधिक होत नसल्याचे देखील वजन वाढले जाते.
हेल्दी राहण्यासाठी आठवड्यातून किमान चार वेळा व्यायाम करण्याचा सल्ला आरोग्य तज्ज्ञांकडून दिला जातो. यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती ते स्नायू मजबूत होण्यास मदत होते. घरच्या घरी काही सोप्प्या व्यायामाच्या मदतीने पोटावरील चरबी कमी करू शकता.
दोरीच्या उड्या
शरीरातील अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यासाठी दोरीच्या उड्यांचा पर्याय बेस्ट आहे. याच्या मदतीने पोटावरील चरबी वेगाने कमी होईल. दिवसातून अर्धा तास दोरीच्या उड्या मारल्याने जवळपास 300 कॅलरीज बर्न होऊ शकतात. त्याचसोबत उच्च रक्तदाब आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो. गुडघ्यांचा त्रास असल्यास दोरीच्या उड्यांचा व्यायाम करणे टाळा.
पुश-अप
पुश-अप व्यायामुळे शरीरातील स्नायू बळकट होतात. खासकरून हात, पोट आणि पायाचे स्नायू मजबूत होतात.पहिल्यांदाच पुश-अप एक्सरसाइज करणार असल्यास जिम ट्रेनरची मदत घ्या. चुकीच्या पद्धतीने पुश-अप केल्यास शरीराच्या स्नायूंवर अधिक ताण पडला जाईल.
सायकलिंग
दररोज अर्धा तास सायकलिंग केल्याने आरोग्याला मोठा फायदा होतो. हृदयाचे आरोग्य देखील निरोगी राहण्यास मदत मिळू शकते. त्याचसोबत शरीराचे स्नायू टोन्ड होण्यासह वजन कमी होण्यास मदत मिळू शकते. यामुळे पोटावरील चरबी देखील कमी होते. सायकलिंग करताना पायांची सतत हालचात होत असल्याने पायाचे स्नायूही मजबूत होतात.
बर्पी एक्सरसाइज
शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी करण्यासाठी बर्पी एक्सरसाइज करू शकता. बर्पी एक्सरसाइज करताना अधिक थकवा येऊ शकतो. यामुळे शक्य होईल तितकाच वेळ हा व्यायाम करावा. बर्पी एक्सरसाइजमुळे शरीराचा स्टॅमिना वाढला जातो.
प्लँक एक्सरसाइज
प्लँक एक्सरसाइजचा सराव करू शकता. यामुळे पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि पोटावरील चरबी वेगाने कमी होण्यास मदत होते. शिवाय पाठीचा कणा मजबूत होतो आणि मूडही फ्रेश राहतो.
आणखी वाचा:
World AIDS Day 2023 : एड्सच्या या भयंकर लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, कारण...
Fitness Tips : रकुलप्रित सिंहसारखी हॉट फिगर हवीय? सकाळी उपाशी पोटी प्या ही कॉफी
Walking Benefits : 10 ते 60 मिनिटे वॉक करण्याचे हे आहेत अगणित फायदे
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.