सार
World AIDS Day 2023 : समाजात एड्स आजाराबाबत आजही खुलेपणाने बोलले जात नाही. पण या आजारावर मोकळेपणाने चर्चा करणे व संसर्ग झाला असल्यास त्यावर वेळीच औषधोपचार करणे गरजेचे आहे.
HIV Symptoms & Treatment: दरवर्षी 1 डिसेंबरला 'जागतिक एड्स दिन' साजरा केला जातो. एड्स या गंभीर आजाराबाबत समाजात जागरूकता निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. वैद्यकीय तपासणींपासून ते एड्स रोगाबाबत जनजागृती करण्यासाठी मोहीम राबवली जाते.
एचआयव्ही (HIV) व्हायरसमुळे एड्स रोगाचा संसर्ग होतो. हा जीवघेणा व्हायरसमुळे रूग्णाच्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. यामुळे एड्ससोबत क्षयरोग, कॅन्सर यासारखे गंभीर आजारांचीही लागण होण्याचा धोका वाढतो. एड्सची लागण होण्याचे सर्वसामान्य कारण म्हणजे एकापेक्षा अधिक पार्टनरसोबत शारीरिक संबंध ठेवणे.
अशाच व्यक्तीला एड्स आजार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळे वेळीच या गोष्टी टाळणं आवश्यक आहे. जाणून घेऊया एड्सची लक्षणे, उपचार याबाबतची सविस्तर माहिती…
एड्स संसर्गजन्य आजार
एचआयव्हीग्रस्त व्यक्तीचे रक्त, एड्सग्रस्त आईकडून बाळासही या आजाराची लागण होऊ शकते. याशिवाय एकापेक्षा अधिक पार्टनरसोबत लैंगिक संबंध ठेवल्यासही एड्सची लागण होण्याचा धोका असतो. तसंच पुरुष आणि महिलांमध्ये एचआयव्हीची लक्षण वेगवेगळी दिसतात.
पण या रोगाच्या काही सामान्य लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष न करण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. अन्यथा या विकारामुळे जगणे असह्य होऊ शकते. देशभरात दरवर्षी वर्षाला लाखो जणांना एड्सची लागण झाल्याची माहिती समोर येते.
जाणून घेऊया एड्सची लक्षणे…
- एड्सग्रस्त रूग्णामध्ये सुरुवातीस दोन ते चार आठवड्यांमध्ये तापाची लक्षणे दिसू शकतात.
- रुग्णाला शारीरिक थकवा जाणवतो. थकवा इतका वाढतो की दैनंदिन स्वरुपातील काम करणंही कठीण होते. शिवाय शरीराचे वजन जलदगतीने घटू लागते.
- रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्याने लीम्फ ग्लँड्सनाही (lymph glands) सूज येऊ लागते. यामुळे मान, काख आणि मांड्यांचा भागही सुजतो.
- सलग काही आठवडे खोकला येत असल्यास क्षयरोग झाल्याचा गैरसमज करून घेऊ नये. एचआयव्हीमुळेही समस्या उद्भवू शकते. शिवाय खोकताना रक्तस्त्रावही होतो.
- पोटदुखीची समस्या उद्भवते. गॅस होणे, बद्धकोष्ठतेचही लक्षणे आढळतात.
एड्सपासून बचाव करण्यासाठी उपाय
एचआयव्ही आजारातून मुक्तता व्हावी, यासाठी उद्याप कोणतीही लस उपलब्ध झालेली नाही. पण काही गोष्टींची काळजी घेतल्यास नक्कीच या आजारापासून स्वतःला दूर ठेवणे शक्य आहे.
- सुरक्षितरित्या शारीरिक संबंध ठेवणे
- एड्सग्रस्त व्यक्तीचे रक्त अथवा शिंका-खोकल्या वाटे द्रवस्वरुपात बाहेर पडणाऱ्या रोगजंतूच्या संपर्कात येऊ नये
- एचआयव्हीचे व्हॅक्सिन घ्यावे
आणखी वाचा:
Pneumonia Outbreak : चीनमध्ये नव्या महामारीचा धोका वाढतोय, महाराष्ट्रासह या राज्यांतही अॅलर्ट जारी
पीरियड्समध्ये चुकूनही या गोष्टींचे करू नका सेवन, अन्यथा...
Feet Care Tips: फ्लॅट फुटवेअर वापरताय? तुमच्या आरोग्यावर होताहेत इतके गंभीर
तज्ज्ञांचा सल्ला
Disclaimer : सदर लेख केवळ सामान्य माहिती देण्याकरिता आहे. Asianet News या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी आपण तज्ज्ञ किंवा आपल्या ओळखीच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.